Bhiwandi News: भिवंडीत ईद ए मिलाद मिरवणूकीत दुर्घटना, झेंडा उंचावताना विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने तरुणाचा मृत्यू

भिवंडीत ईद-मिलाद-उन-नबी मिरवणुकीत ध्वजारोहण करताना विजेचा झटका लागून तरुणाचा मृत्यू झाला.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Bhiwandi News: काल सर्वत्र ईद ए मिलाद निमीत्ताने मुस्लिम बांधव ईद साजरी करत होते. दरम्यान भिंवडीत (Bhiwandi) एक दुर्घटना घडली. ज्यात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. भिवंडीतील पिराणी पाडा परिसरातून ईद मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणाला झेंडे लावून घोषणाबाजी करत होता. दरम्यान त्याने झेंडे उंचावताना विद्यूत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने विजेच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

अश्फाक शेख असं या मृत तरुणाचे नाव आहे.भिवंडीतील पिराणी पाडा परिसरातून ईद मिरवणुक साजरा करत होता.  रझा अकादमी भिवंडी आणि ईद मिलाद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक मिरवणूक कोटर गेट येथून काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. अनेकांनी झेंडे हातात घेवून मिरवणुक काढली होती. दरम्यान अश्फाकच्या हाती असलेला झेंडा त्याने उंचावला.

विद्यूत प्रवासाच्या संपर्कात आल्याने तरुणाला विजेचा झटका लागला, त्यामुळे त्याचा जागीत मृत्यू झाला. परिसरात या घटनेमुळे काही वेळ खळबळ उडाली होती. सुरुवातीला या मिरवणुकीत कुराण चे पठण करण्यात आहे होते. त्यानंतर मिरवणुक  काढण्यात आली होती.