Thane: देवळातील पैशांची पेटी चोरण्यासाठी भामट्याने लढवली शक्कल, आधी पडला पाया नंतर मारला डल्ला
त्यासाठी त्याने आधी देवाळातील देवाला नमस्कार केला आणि त्यानंतर पैशांची पेटी चोरली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
Thane: ठाणे येथे एका भामट्याने चोरी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. त्यासाठी त्याने आधी देवाळातील देवाला नमस्कार केला आणि त्यानंतर पैशांची पेटी चोरली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यामध्ये असे दिसून आले आहे की, आरोपीने खोपट परिसरातील हनुमानाचे मंदिर तोडले. ही घटना 9 नोव्हेंबरची आहे.(Navi Mumbai Crime: रेल्वे प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल हिसकावणाऱ्या एका चोराला वाशी जीआरपीकडून अटक)
आरोपीने मंदिर तोडल्यानंतर त्याने पैशांची पेटी चोरली. त्यामध्ये 1 हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याबद्दलची तक्रार मंदिराची देखरेख करणाऱ्या व्यक्तीने केली.(Online Fraud in Maharashtra: निवृत्त आरबीआयच्या कर्मचाऱ्याची तब्बल 3.38 लाखांची फसवणूक, ठाणे येथील घटना)
Tweet:
सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, आरोपीने चोरी करण्यापूर्वी देवासमोर नमस्कार केला. त्यानंतर तेथे असलेली पैशांची पेटी चोरली. या घटनेचे फुटेज सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले आहेत. आरोपीला नौपाडा पोलिसांनी अटक केली असून त्याने चोरलेली रक्कम सुद्धा त्याच्याकडून जप्त केली आहे.