Thane Shocker: पोटच्या लेकीवर बापाचा बलात्कार; पोलिसांत गुन्हा दाखल होताच रेल्वे समोर उडी मारत आत्महत्या
तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी देखील फरार होता. मात्र त्याच दिवशी घरातून बाहेर पडलेल्या आरोपीचा मृतदेह रेल्वे रूळांवर आढळला. रेल्वे पोलिसांनी या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू केली आहे.
ठाणे (Thane) शहरामध्ये एका व्यक्तीने 11 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याच्या गुन्हा दखल झाल्याच्या काही तासतच ट्रेन समोर उडी मारून जीव दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 40 वर्षीय आरोपीचा पोलिस शोध घेत होते. त्याच्यावर 26 ऑक्टोबर दिवशी गुन्हा दाखल होता त्याच दिवशी तो रेल्वे ट्रॅकवर मृतावस्थेमध्ये आढळला.
आरोपी हा व्यवसायाने रिक्षा चालक होता. बदलापूर मध्ये तो आपल्या मुलीसोबत राहत होता. त्याची पत्नी मागील 2 वर्ष दुबई मध्ये आहे. तेथेच ती काम करते. अशी माहिती senior inspector Arun Khsirsagar यांनी दिली आहे. Rape Charge: 'भारतीय समाजात कोणतीही मुलगी बलात्काराचा खोटा आरोप लावणार नाही’, मुंबई कोर्टाने लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला सुनावली 10 वर्षांची शिक्षा .
जुलै 2022 ते ऑक्टोबर दरम्यान या आरोपीने स्वतःच्या मुलीवर सातत्याने बलात्कार केल्याचे त्याच्यावर आरोप होते. या मुलीने आपल्या आजिकडे या घृणास्पद छळाबद्दल मन मोकळं केलं होतं. नंतर आईला देखील सांगितलं. काही दिवसांसाठी तिची आई भारतामध्ये आली होती. तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आला. पोलिसांनी संबंधित कलमं आणि पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे. (हेही वाचा: Ahmednagar Crime News: विवाहीत पुतणीसोबत काकाचे विवाहबाह्य संबंध, दुसऱ्या तरुणाशी बोलल्याच्या रागातून हत्या)
पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी देखील फरार होता. मात्र त्याच दिवशी घरातून बाहेर पडलेल्या आरोपीचा मृतदेह रेल्वे रूळांवर आढळला. रेल्वे पोलिसांनी या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू केली आहे.