Thane Shocker: दहावीच्या वर्गातील मुलीचा चित्रकलेच्या शिक्षकाकडून विनयभंग; आरोपी अटकेत
त्याच्या विरुद्ध आयपीसी कलम 34 आणि पोक्सो अॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आदराचं नातं असते. पण ठाण्यातील कळवा भागातील एका शाळेमध्ये दहावीच्या वर्गातील मुलीचा विनयभंग केल्याचं सांगत 48 वर्षीय शिक्षकाला अटक केली आहे. हा शिक्षक चित्रकलेचा शिक्षक होता. विनयभंगाची घटना महिन्याभरापूर्वीची आहे. यामध्ये मंगळवार, 12 सप्टेंबर दिवशी योगेश अहिरे (Yogesh Ahire) या शिक्षकाला अटक झाली आहे.
9 ऑगस्ट दिवशी पीडीत मुलगी शिक्षकाच्या खोलीत गेली होती. यावेळी शिक्षकाने विद्यार्थीनी सोबत गैरवर्तन केले. तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. आक्षेपार्ह भाषेचाही वापर केला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
विद्यार्थीनीला या घटनेचा धक्का बसला. वर्गात जाऊन ती रडायला लागली. तिच्या एका वर्गमित्राने तिला मुख्याध्यापकाकडे नेले. त्यानंतर त्यांनी सारी माहिती घेतल्यानंतर आरोपीला देखील बोलावून घेतले आणि नेमकं काय घडलं? याचा जाब विचारला.
पीटीआई वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पीडीतेचे पालक देखील स्थानिक राजकीय नेत्यांकडे गेले त्यांनी शाळेवर, त्यांच्या प्रशासनावर दबाव टाकला. नक्की वाचा: Pune: शारीरिक प्रशिक्षणादरम्यान 13 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक अटकेत.
पोलिसांनी आरोपी अहिरेला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध आयपीसी कलम 34 आणि पोक्सो अॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे.