ठाणे: ईव्हीएम वर शाई फेकणाऱ्या आरपीआयच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
राज्यभरात आज सोमवारी विधानसभा निवडणकीचे (Maharashtra Assembly Election 2019) मदतान होत आहे. मतदान करण्यासाठी थोडाच वेळ शिल्लक राहिला असताना ठाणे (Thane) मतदार केंद्रावर शाई फेकण्याची घटना घडली आहे. म
राज्यभरात आज सोमवारी विधानसभा निवडणकीचे (Maharashtra Assembly Election 2019) मदतान होत आहे. मतदान करण्यासाठी थोडाच वेळ शिल्लक राहिला असताना ठाणे (Thane) मतदार केंद्रावर शाई फेकण्याची घटना घडली आहे. मतदान करण्यासाठी आलेल्या मतदाराने निवडणूक कर्मचाऱ्यांजवळील शाईची बॉटल हिरकावून थेड ईव्हीएम मशीनवर फेकली. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तोबडतोब मतदाराला ताब्यात घेतले आहे. सुनिल तांबे (Sunil Tambe)असे या निर्दशकांचे नाव असून ते बीएसपी कार्यकर्ते असल्याचे माहिती समोर आली आहे. पोलिस पकडून नेत असताना या मतदाराने ईव्हीएम मशीन मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या आहेत. ईव्हीएम मशीनमुळे भारताची लोकशाही धोक्यात आल्याचेही त्यावेळी ते म्हणाले आहेत.
ठाणे येथे मतदान करायला आल्यानंतर सुनिल तांबे यांनी ईव्हीएम मशीवर राग व्यक्त करत ईव्हीएम मशीन मुर्दाबाद असा घोषणाही दिल्या आहेत. तसेच, ईव्हीएम मशीन नही चलेगा, ईव्हीएम मशीन जलादो.. आम्हाला ईव्हीएम मशीन नाही पाहीजे. हा आमचा वैचारिक मार्ग आहे, आम्हाला लोकशाहीने अधिकार दिला आहे. ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे. सर्व पक्षांना गुंडाळले जात आहे. हा केवळ ईव्हीएमचा खेळ आहे. ईव्हीएममुळे देशाला आणि लोकशाहीला धोका झालेला आहे. म्हणून मला फासावर चढवले तरी चालेल, परंतु या ईव्हीएमचा हा खेळ आम्ही सहन करणार नाही. ईव्हीएमचा खेळ आम्ही हाणून पाडणार. लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल, तर ईव्हीएम बंद झाले पाहिजे, असं सुनिल खांबे म्हणत होते. यानंतर पोलीस सुनिल खांबे यांना जीपमध्ये टाकून मतदान केंद्रावरून रवाना झाले. हे देखील वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडूक 2019: अरे व्वा! 102 वर्षांच्या मतदाराने केले मतदान; रुग्णालयात उपचार घेत असतानाही बजावले कर्तव्य
एएनआयचे ट्वीट-
गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम मशीनच्या विरोधात अनेकांनी आवाज उचलला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणूक आयोगाकडे पुढील निवडणूक बॅलेट पेपर घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली होती. तसेच ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही अडचण नसल्याचे सांगितले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)