Thane Police: विनयभंगाचा आरोप असलेला ठाण्यातील ऑटोचालक कातिकादला उर्फ राजू अब्बाय गजाआड
कातिकादला उर्फ राजू अब्बाय असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. ठाणे पोलिसांनी (Thane Polic) त्याला 14 ऑक्टोबर रोजी अटक केली.
Thane Molestation Case: तरुणीचा विनयभंग (Molestation) करुन तिला फरफटत नेणाऱ्या ठाणे (Thane ) येथील ऑटोरिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. कातिकादला उर्फ राजू अब्बाय असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. ठाणे पोलिसांनी (Thane Police) त्याला 14 ऑक्टोबर रोजी अटक केली. तरुणीचा विनयभंग केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. परंतू, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
ठाणे रेल्वे स्टेश Thane Railway Station) परिसरात आरोपीने तरुणीचा विनयभंग केला होता. आरोपीने तरुणीचा केवळ विनयभंगच केला नाही तर तिला रिक्षासोबत फरफटतही नेले. उपस्थितांनी ही घटना पाहिली. परंतू, तरुणीची मदत करुन ऑटोचालकाला पकडेपर्यंत त्याने रिक्षासह पोबारा केला होता. मात्र, घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे पोलिसांना त्याचा धागादोरा लागला. (हेही वाचा, Thane: ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग; जाब विचारायला गेलेल्या तरुणीला आरोपीने नेले फरफटत, Watch Video)
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ठाणे पोलिसांनी आरोपी (ऑटोचालक) कातिकादला उर्फ राजू अब्बाय याला 14 ऑक्टोबर रोजी अटक केली. पोलिसांनी आरोपीला नवी मुंबई परिसरातील दिघा येथून ताब्यात घेतले. त्याची रिक्षाही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ट्विट
दरम्यान, ठाणे शहरात या आधीही महिला विनयभंगाच्या अशाच घटना अनेक वेळा घडल्या आहेत. त्यामुळे ठाणे शहरातच अशा प्रकारच्या घटना वारंवार का घडत आहेत असा सवाल विचारला जातो आहे. दुसऱ्या बाजूला आता विद्यमान मुख्यमंत्रीच ठाणे शहरातून येतात. त्यामुळे ठाणे शहरात शांतता व सुव्यवस्था अधिक चांगली राखण्याचे आव्हान शहर पोलिसांकडे आहे.