ठाणे: मॉल रेस्टॉरंटमध्ये चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक, तिघांची सुटका
या दोघांनी मिळून तीन गरीब महिलांना देहविक्रीच्या व्यवसायात आणले होते. या तिन्ही महिला अत्यंत गरीब होत्या. दरम्यान, पोलीस पुढील तपास करत आहेत.
ठाणे (Thane) शहरातील लेकसिटी या नामांकीत मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये सुरु असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा (Sex Racket) ठाणे पोलिसंनी (Thane police) पर्दाफाश केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन दलालांना अटक करण्यात आली. तर, दोन बहिणी आणि एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. आरोपींना 18 फेब्रुवारीपर्यं पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मानवी उर्फ पल्लवी गुवारिया (वय 20, रा. मालाड), सुमितसिंग सिंग (वय 41, रा. कांदिवली) अशी अटक करण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत. सुमितसिंग हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहीत आहे. आरोप आहे की, मानवी उर्फ पल्लवी गुवारिया ही सुमितसिंग याच्या मदतीने देहविक्रिसाठी महिला पुरवत असे. गरीब आणि गरजू तरुणींना पैशाचे अमिष दाखवून मानवी ही देहविक्रियाच्या व्यवसायात आणत असे. रेस्टॉरंटमध्ये चालत असलेल्या प्रकाराची ठाणे पोलिसांना कुणकुण लागली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी सापळा लावला आणि कारवाई केली. (हेही वाचा, ठाण्यातील सेक्स रॅकेट उघडकीस, पोलिसांनी ठोकल्या सहा जणांना बेड्या)
मानवी गवारिया आणि तिचा सहकारी सुमितसिंग यांच्यावर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी मिळून तीन गरीब महिलांना देहविक्रीच्या व्यवसायात आणले होते. या तिन्ही महिला अत्यंत गरीब होत्या. दरम्यान, पोलीस पुढील तपास करत आहेत.