Thane: भिवंडी येथे कचऱ्या डब्यात सापडली नवजात मुलगी
यामुळे खळबळ निर्माण झाली आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
Thane: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कोर्टाजवळ असलेल्या एका कचऱ्याच्या डब्यात नवजात मुलीला टाकून अज्ञात महिलेने पळ काढल्याची घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ निर्माण झाली आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहचत पोलिसांनी ज्या कचऱ्या डब्यात मुलीला टाकले होते तेथून तिला सुखरुप बाहेर काढले गेले.(महिलेने कचरा समजून बाळालाच डस्टबिनमध्ये टाकले; हरभजन सिंह याने व्हिडिओ शेअर करत केला शिखर धवनला टॅग, काढली आठवण)
या प्रकरणी शांती नगर पोलीस स्थानकात कलम 318 अंतर्गत अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवजात मुलीला कोर्टाच्या परिसरातील भिंतीजवळ असलेल्या एका कचऱ्या डब्यात रात्री 1.30 वाजताच्या सुमारास सापडली. नवजात मुलीला एका हिरव्या रंगाच्या कापडात गुंडाळण्यात आले होते. पोलिसांकडून अज्ञात महिलेचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.(Mumbai: सायन रुग्णालयात 8 वर्षीय मुलीचा छळ केल्याप्रकरणी कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक)
यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वीच कल्याणच्या रेल्वे गुन्हे शाखेकडून 27 वर्षीय महिला आणि तिचा 33 वर्षीय प्रियकल यांनी नवजात मुलाला लोकलमध्ये सोडून पळ काढल्याप्रकरणी डोंबिवलीत अटक केली. त्या मुलाला डोंबिवलीतील चिल्ड्रन केअर सेंटरमध्ये पाठवले गेले. तर महिलेने 19 नोव्हेंबरला बाळाला जन्म दिला. त्यानंतर 20 नोव्हेंबरला रात्री 1.30 वाजताच्या सुमारास त्या मुलाला एका प्लास्टिक बॅगमध्ये भरले आणि डोंबवली स्थानकात येत टिटवाळा ट्रेन पकडली. तिने मुलाला ट्रेनमध्ये सोडून देत ती ठाकुर्ली येथे उतरली. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर घटनेचा खुलासा होत आरोपींना ताब्यात घेण्यात आले.