IPL Auction 2025 Live

Thane: ठाण्यातील कोरोना व्हायरस क्वारंटाईन सेंटर मध्ये बाळाला मारण्याची धमकी देत आईवर बलात्कार; कर्मचाऱ्याला अटक

या प्रकरणी सेंटरमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यातील कोविड-19 (Coronavirus) क्वारंटाईन सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार (Rape) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सेंटरमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारी याबाबत माहिती दिली. नवघर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संपत पाटील यांनी सांगितले की, ही घटना जूनमध्ये घडली होती, परंतु या 20 वर्षीय महिलेने आता पोलिसांत तक्रार दाखल केल्याने ही घटना उघडकीस आले. या महिलेच्या 10 महिन्यांचा बाळाला जीवे मारण्याची धमकी देय तरुणाने बलात्कार केला.

संपत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा रोड परिसरातील कोविड सेंटरमध्ये या महिलेचा 11 वर्षीय नातेवाईक भरती होता. या नातेवाईकाची काळजी घेण्यासाठी ही महिला आपल्या दहा महिन्यांच्या मुलीसह इथल्या सेंटरमध्ये राहत होती. गरम पाणी देण्याच्या बहाण्याने आरोपी रात्री खोलीत भेट देत असत. त्यानंतर त्याने या महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने त्याला विरोध केल्यावर तरुणाने तिच्या 10 महिन्याचा बाळाला मारण्याची धमकी दिली व तिच्यावर बलात्कार केला. (हेही वाचा: 24 वर्षीय युवकाचा शेजारी राहणाऱ्या 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पोलिसांकडून अटक)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाने महिलेवर जून च्या पहिल्या आठवड्यात तीन वेळा बलात्कार केला. घडलेल्या प्रकारामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना त्रास होईल अशी भीती वाटत असल्याने, या महिलेने त्यावेळी पोलिसांकडे संपर्क साधला नव्हता. आता शनिवारी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) आणि इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, याआधी नवी मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये एका 40 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. ही महिला कोरोना विषाणू सकारात्मक होती. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात भादंवि कलम 376 आणि 354 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.