Thane: बाळाच्या मृत्यूसाठी जन्मदात्या आईला अटक, असा झाला घटनेचा खुलासा
शांता चव्हाण असे आरोपी महिलेचे नाव असून तिचा नवरा हा कामगार आहे.
Thane: कळवा येथे एका 30 वर्षीय महिलेने आपल्याच सहा महिन्याच्या बाळाला पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये टाकून त्याची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शांता चव्हाण असे आरोपी महिलेचे नाव असून तिचा नवरा हा कामगार आहे. तसेच मृत बाळासह अन्य तिला दोन मुल सुद्धा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.(Pune Thift: पुण्यामध्ये चोरट्यांनी एटीएममध्ये स्फोट करत 19 लाखांची चोरी, आरोपींचा शोध सुरू)
प्राथमिक तपासात असे समोर आले की, महिलेकडून बाळाला खोकला झाल्याने सातत्याने कफ सीरप दिल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर बाळाचा मृतदेह महिलेने शेजाऱ्यांच्या पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये टाकला. असे कृत्य केल्यानंतर महिलेने पोलिसांनी धाव घेत, तिचे बाळ बेपत्ता झाल्याचा आव आणत तक्रार दाखल केली. महिलेने केलेल्या तक्रारीवरुन बाळाचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.
पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासून पाहिले. परंतु त्या मध्ये काही संशयास्पद दिसून आले नाही. पोलिसांनी काही संशयितांना सुद्धा ताब्यात घेतले पण त्यांचा त्यामध्ये सहभाग नव्हता. महिलेला पोलिसांकडून जेव्हा वारंवार प्रश्न विचारले गेले तेव्हा तिने आपला गुन्हा कबुल केला. या घटनेचा खुलासा अवघ्या 24 तासात झाला.(पुण्यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून लहान मुलीसह विवहितेने केली होती आत्महत्या; 29 वर्षांनंतर कोर्टाकडून पतीला दोषी ठरवत तुरूंगात रवानगी)
महिलेने गुन्हा कबूल केल्यानंतर असे म्हटले की, बाळ आजारी पडल्यानंतर त्याला देण्यात आलेल्या सीरपमुळे त्याची प्रकृती अधिक बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आपल्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून त्याला पाण्याच्या ड्रममध्ये टाकल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. पोलिसांकडून आता या गुन्हापाठी आणखी काय उद्देश होता का याचा सुद्धा तपास केला जात आहे.