IPL Auction 2025 Live

डोंबिवली मध्ये स्थलांतरित मजुरांची मेडिकल सर्टिफिकेट्स घेण्यासाठी लांबच लांब रांग; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

प्रायव्हेट मेडिकल क्लिनिक्सच्या बाहेर लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत.

Long Queues in Dombivli | Photo Credits: Twitter/ ANI

देशभरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी 24 मार्च पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सध्या वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता केंद्र सरकारने 17 मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढवला आहे. पण संचारबंदीच्या नियमांमध्ये शिथीलता आणत देशात ग्रीन, ऑरेंज, रेड झोननुसार विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान देशात विविध भागामध्ये अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटक यांच्या सुटकेसाठी आता सरकारकडून विशेष ट्रेन चालवली जात आहे. यामध्ये Asymtomatic असणार्‍यांना आता मेडिकल सर्टिफिकेट आणि प्रशासनाच्या परवानगीने आपल्या मूळ गावी परतण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र मेडिकल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी स्थलांतरित मजुरांनी डोंबिवली मध्ये मोठी गर्दी केली आहे. प्रायव्हेट मेडिकल क्लिनिक्सच्या बाहेर लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत.

दरम्यान मुंबई महानगरपालिका क्षेत्र आणि नजिकच्या भागात मागील काही दिवसांत संचारबंदीच्या नियमांमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली होती. मात्र नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडत घराबाहेर पडत असल्याने आता मुंबईसह नजिकच्या परिसरात पुन्हा नियम कडक करण्याचे आदेश दिले आहेत. Coronavirus Update Of Maharashtra: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सहित तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी.

ANI Tweet   

दरम्यान लॉकडाऊन वाढवण्याआधी सरकरने प्रवासी संख्या आणि गरज पाहून दोन स्थानकांमध्ये श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्याची मुभा दिली होती. मात्र आता या ट्रेनचा फायदा घेत मूळगावी परतण्याचे वेध लागलेल्या अनेकांकडून देशात लॉकडाऊन सोबतच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जात आहे. दरम्यान नागपूर, पुणे, नाशिक येथून उत्तर भारतामध्ये मजुरांना विशेष ट्रेन्सच्या माध्यमातून घरी पोहचवण्याची सोय केली आहे.