Sudden Death of Thane Man: भांडणानंतर हृदयविकाराचा झटका; तरुण उभ्या उभ्याच कोसळला; शिवसेना नेत्याच्या मुलाचा मृत्यू (Watch Video)

ते 47 वर्षांचे होते. प्राप्त माहितीनुसार, मिलिंद यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसमयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Milind More Dies | Photo Credit: X)

Thane News: शिवसेना ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे (Milind More) (वय ४७) यांचे निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. प्राप्त माहितीनुसार, मिलिंद यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसमयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, मिलंद हे उभ्या असलेल्या कारला टेकून उपस्थितांसोबत बोलत आहेत. दरम्यान, उभ्या उभ्याच ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, मिलिंत आणि त्यांचे काही आप्तेष्ठ यांच्यासोबत ठाणे येथून पिकनीकला गेले होते. दरम्यान, पिकनिकनंतर नवापूर येथील सेव्हन सी वॉटरपार्क आणि बीच रिसॉर्टमधून बाहेर पडत असताना मिलिंदच्या कुटुंबातील सदस्यास एका ऑटोरिक्षाने त्यांना धडक दिली. रिक्षाची धडक बसलेला व्यक्ती त्यांचा भाचा असल्याचे समजते. ही धकड चुकून झाली असली तरी त्यांच्या भाच्याच्या पायाला बरीच दुखापत झाली. या वेळी, ऑटोरिक्षाचालक आणि इतर काही मंडळींची त्यांची बाचाबाची झाली. मिलिंदने ड्रायव्हरला थप्पड मारली. ज्यामुळे रिसॉर्टमधील 8 ते 10 जणांच्या गटाने हल्ला केला. या टोळक्याने मिलिंदच्या छाती आणि पोटाला लक्ष्य करत त्याच्यावर हल्ला केला. हा वाद रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. (हेही वाचा, Thane Shocker: ठाण्यात क्षुल्लक कारणावरून फळविक्रेत्याचा दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; पिता-पुत्राला पोलिसांकडून अटक)

प्रतिसाद आणि तपास

मिलिंदला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप निश्चित झाले नसले नाही. मात्र, कुटुंबीयांचा आरोप आहे की, अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मिलिंद यांना हृदयविकाराचा झटका आला असावा. अर्नाळा पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, बेदरकारपणे वाहन हाकणे, दंगल घडवून आणणे या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

व्हिडिओ

स्थानिक समुदायाला धक्का

मिलिंदचे वडील रघुनाथ मोरे, आनंद दिघे यांच्यानंतर ऑगस्ट 2001 मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष झाले. मिलिंद मोरे यांच्या निधनाने कुटुंब आणि स्थानिक समुदायाला धक्का बसला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, या घटनेचा तपास सुरूच आहे, अधिकारी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले तपशील आणि साक्षीदारांचे जबाब तपासत आहेत.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किरकोळ वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन एकाचा जीव गेल्याने परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.