मुलाच्या शाळेत कार्यक्रमात नाचली, नवऱ्याने बायकोला बॅटने धोपटले
ठाण्यामध्ये एका नवऱ्याने आपल्या बायकोला मुलाच्या शाळेतील एका कार्यक्रमात डान्स केल्याने अत्यंत क्रूरपणे बॅटने धोपटल्याची विचित्र घटना घडली आहे.
ठाण्यामध्ये एका नवऱ्याने आपल्या बायकोला मुलाच्या शाळेतील एका कार्यक्रमात डान्स केल्याने अत्यंत क्रूरपणे बॅटने धोपटल्याची विचित्र घटना घडली आहे. या प्रकरणी बायको गंभीर जखमी झाली असून तिच्या हातापायाला दुखापत झाली आहे.
अल्पा काळोखे असे या महिलेचे नाव आहे. 19 जानेवारी रोजी अल्पा ही मुलाच्या शाळेतील कार्यक्रमावरुन घरी परतली. त्यावेळी अल्पाला तिचा नवरा सुनिलने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कारण तिने मुलाच्या शाळेत कार्यक्रमात भाग घेऊन नृत्य केले होते. मात्र काही दिवसांपूर्वीत अल्पाने सुनिलला ती मुलाच्या शाळेतील कार्यक्रमात भाग घेऊ का अशी विचारणा केली होती. परंतु सुनिलला ही गोष्ट मान्य नव्हती.
गेल्या आठवड्यात या दोघांमध्ये कार्यक्रमाच्या सहभागावरुन कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे संतापलेल्या सुनिलने क्रिकेटची बॅट घेऊन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी अल्पा गंभीर जखमी झाली. तर पोलिसांनी आरोपी सुनिलला अटक केली असून त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2019 01:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

