ठाणे: नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
लष्कारातील माजी सैनिकाच्या मुलाला मुंबईतील (Mumbai) भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये (BARC) नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लष्कारातील माजी सैनिकाच्या मुलाला मुंबईतील (Mumbai) भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये (BARC) नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना ठाणे (Thane) येथील नौपाडा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच आरोपींना 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. आरोपींनी याआधीही अनेकांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाला आहे.
अमृत मंडले आणि रविराज चव्हाण असे आरोपींचे नावे आहे. मंडले हा ठाणे येथील सावरकरनगर येथे राहतो, तर रविराज हा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात राहणारा आहे. मंडले आणि रविराज यांच्यासर 5 जणांनी कोल्हापूर येथील तानाजी देसाई या लष्करातील माजी सैनिकाच्या मुलाला बीएआरसीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 4 लाख 75 हजार रुपयांची घेतले होते. परंतु, देसाई यांच्या मुलाला गेल्या 1 वर्षापासून नोकरीला न लावता पैसेही परत केले नाहीत. यामुळे तानाजी यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात मंडले आणि रविराज यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. हे देखील वाचा-मुंबई येथे नाइट लाइफसाठी आवश्यक बंदोबस्ताबाबत अद्याप पोलीस तयारीत नाहीत- अनिल देशमुख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडले आणि त्याच्या टोळीने अनेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत त्यांनी 20 ते 25 लाखांची लूट केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीला लावण्याचे आमिष दाखवल्याप्रमाणे कुठेही नोकरी लागली नाही. त्यांचे पैसेही परत न केल्याने अखेर कोल्हापूरच्या राजावाडी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली. ही तक्रार 6 जानेवारी रोजी ठाण्यातील नौपाडा ठाण्याकडे वर्ग करण्यात आली.