ठाणे: सोन्याच्या दुकानात ग्राहकांना नव्या स्किमची भुरळ, पैसे गुंतवणुकीच्या नावाखाली मालकाकडून लाखो रुपयांचा गंडा

संतोष शेलार असे दुकान मालकाचे नाव असून मराठी माणसाला प्रगती करण्यासाठी मदत करा अशी बतावणी त्याच्याकडून ग्राहकांनी केली जात.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

ठाणे (Thane) येथील एका सोन्याच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना नवनव्या स्किमबद्दल मालकाकडून सांगितले जायचे. तसेच दुकान मालकाने सांगितलेल्या स्किममध्ये ग्राहकांना तो गुंतवणुक करायला सांगायचा. मात्र ग्राहकांना त्यांची फसवणुक झाल्याचे कळल्यावर त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली.

नौपाडा भागातील त्रिमूर्ती ज्वेलर्स असे दुकानाचे नाव आहे. संतोष शेलार असे दुकान मालकाचे नाव असून मराठी माणसाला प्रगती करण्यासाठी मदत करा अशी बतावणी त्याच्याकडून ग्राहकांनी केली जात. तर मराठी माणूस असल्याचे कार्ड दाखवत ग्राहकांना शेलार याने आकर्षित केले. तसेच ग्राहकांची मोठ्या प्रमाणात दुकानात गर्दी पाहून त्याने ग्राहकांसाठी नव्या स्किम सुरु केल्या. तर प्रत्येक महिन्याला हजार रुपयांपासून वर्षभरासाठी गुंतवणूक करा आणि 18 हजार रुपयांचे सोने खरेदी करण्याची ऑफर त्याने ग्राहकांपुढे ठेवली. (जुलै महिन्यात बॅंक व्यवहार ते बेस्ट दर कपात यामुळे सामान्यांची बदलणार अर्थिक गणित)

यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. मात्र 15 महिन्यानंतर ग्राहकांनी त्यांनी गुंतवलेल्या स्किमनुसार सोने खरेदी करण्यासाठी गेल्यास त्यांना दुकानाला टाळ लावल्याचे दिसून आले. त्यामुळे शेलार याला ग्राहकांनी फोनसुद्धा केला. मात्र त्याचे काही उत्तर त्याने दिले नाही. अखेर ग्राहकांनी पोलिसात धाव घेत त्यांना जवळजवळ 3 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला असल्याची तक्रार केली.या प्रकरणी शेलार याला अटक करण्यत आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif