ठाणे येथील खड्डे पुढील 10 दिवसात न बुजवल्यास टोल बंद करणार- एकनाथ शिंदे
त्यामुळे आता ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुढील 10 दिवसात रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.
राज्यात पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातात. जेणेकरुन ऐन पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडून कोणत्याही नागरिकाला जीव गमावू लागू नये म्हणून ही उपाययोजना करण्यात येते. परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात मुंबई (Mumbai), ठाणेसह (Thane) राज्यातील विविध भागात रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुढील 10 दिवसात रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे. त्याचसोबत रस्त्यावरील टोल सुद्धा बंद करणार असल्याचे खडे बोल संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले आहेत.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत असल्याचे ठाणे येथे दिसून येत आहे. तर लवकरच आगामी विधानसभा निवडणूक होणार आहे. याच परिस्थितीत रस्त्यांची अशा पद्धतीची अवस्था असल्यास निवडणूक काळात नागरिक अधिक संपात व्यक्त करतील अशी शंका व्यक्त केली जात आहे. तसेच रस्त्यांबाबत फोटो काढून त्यावर टीका करत सोशल मीडियात पोस्ट लिहिल्या जात आहेत. याच पार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांनी एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत येत्या 10 दिवसात रस्त्यांवरील खड्डे न भरल्यास कारवाई करण्यात येईल असा निर्णय जाहीर केला आहे.(ठाणे: रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटून सहप्रवाशांच्या मदतीने चालत्या रिक्षातून फेकले, पीडित तरुणाची प्रकृती चिंताजनक)
त्याचसोबत विरोधकांकडून रस्त्यांबाबत आमच्या फोटोचे बॅनर लावले जात आहे. याचा अधिक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे ही सांगण्यात आले आहे. त्यामुळे निधी देण्याचे काम आम्ही केले होते. परंतु पुढील काम रस्त्यासंबंधित अधिकाऱ्यांनी करावे अशी ताकिद बैठकीत देण्यात आली आहे. तसेच 2020 मध्ये कल्याण येथील पत्रीपुलाचे काम पूर्ण होणार असून तो वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे.