Man Ends Life Hearing Wife's Voice: बायकोचा आवाज ऐकताच पतीची आत्महत्या

ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्यातील डोंबिवली (Dombivali) परिसरात घडली. सुधाकर यादव (वय-41 वर्षे) असे इसमाचे नाव आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

पत्नीचा आवाज ऐकून पतीने आत्महत्या केल्याची विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्यातील डोंबिवली (Dombivali) परिसरात घडली. सुधाकर यादव (वय-41 वर्षे) असे इसमाचे नाव आहे. त्याने पत्नी संजना यादव (वय-31 वर्षे) यांना फोन करुन त्यांचा आवाज ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्याने आत्महत्या (Man Ends Life Hearing Wife's Voice) केली. सुधाकर आणि संजना पती पत्नी आहेत. दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात थरुन संजना या त्यांच्या बहिणीकडे दिवा येथे राहण्यासाठी गेल्या होत्या. तोवर सुधाकर याने हे कृत्य केले.

आत्महत्येपूर्वी आवाज ऐकण्याची इच्छा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर आण संजना यांच्यात 19 डिसेंबर रोजी किरकोळ कारणावरुन भांडण झाले. या भांडणातून पत्नी संजना दिवा येथे राहात असलेल्या आपल्या बहिणीकडे राहायला गेली. घटना घडली त्या दिवशी (20 डिसेंबर) कुर्ला येथे कामाला जाणाऱ्या पत्नीस (संजना) सुधाकरने फोन केला. फोनवर तिच्यासोबत दोन मिनीटे बोलण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्याने तिच्याकडे आवाज ऐकण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर थेट आत्महत्याच केली. (हेही वाचा, चहाच्या घोटासाठी बायकोचा गळा चिरला)

पत्नीच्या व्हॉट्सअॅपवर धक्कादायक फोटो

पतीने फोन ठेवल्यानंतर पुढच्या काहीच मिनीटांमध्ये संजनाहिच्या व्हॉट्सअॅपवर फोटो आला. तो मेसेज तिच्या पतीनेच पाठवला होता. ज्यामध्ये तो आत्महत्येची तयारी करत असून गळफास घेण्याच्या तयारीत दिसत होता. फोटो पाहून घाबरलेल्या संजनाने तातडीने शेजाऱ्यांना फोन लावला. तसेच, पतीकडे जाऊन त्याची चौकशी करण्यास आणि मदत करण्याची विनंती केली. दरम्यान, शेजाऱ्याने तातडीने घटनास्थळी धाव घेत सुधाकरच्या घराचा दरवाचा ठोठावला. पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला तेव्हा आतमध्ये सुधाकरचा मृतदेह छताला लटकत होता.

पोलीस दप्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद

डोंबिवली पोलिसांना माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तसेच, पोलीस दप्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असली तरी तपास कायम ठेवला आहे. सदर व्यक्तीने नेमकी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा आहे. कोणीही आत्महत्या करुन नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. जर कोणाला काही त्रास असेल, आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर तुम्ही +91 84229 84528 / +91 84229 84529 / +91 84229 84530 या फोन क्रमांकावर संध्याकाळी 4 ते रात्री 10 दरम्यान कोणत्याही दिवशी कॉल करू शकता किंवा talk2samaritans@gmail.com वर ईमेल करू शकता. इथे झालेला संवाद पूर्णपणे गोपनीय असल्याची हमी दिली जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif