Thane Daily Pocso Cases: धक्कादायक! ठाणे जिल्ह्यात प्रतिदिन एका पॉक्सो कायदा प्रकरणाची नोंद, एकट्या कल्याणमध्येच 25% पेक्षा अधिक घटना; वर्षभरातील आकडेवारी

या शहरात पोक्सो (Pocso Act) कायद्यांतर्गत दररोज किमान एक प्रकरण नोंदवले जात आहे. धक्कादायक म्हणजे ही आकडेवारी या वर्षीची असून 16 ऑगस्ट पर्यंतची आहे.

Pocso Act | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Sexual Abuse Cases in Thane: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठाणे (Thane Crime News) शहरातच लहान मुले सुरक्षीत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या शहरात पोक्सो (Pocso Act) कायद्यांतर्गत दररोज किमान एक प्रकरण नोंदवले जात आहे. धक्कादायक म्हणजे ही आकडेवारी या वर्षीची असून 16 ऑगस्ट पर्यंतची आहे. शहराच्या पाच झोनमध्ये नोंदवलेल्या 233 प्रकरणांपैकी एक चतुर्थांश प्रकरणे एकट्या कल्याण शहर (Kalyan Crime) आणि परिसरामध्ये आहेत. ठाणे पोलिसांनी (Thane Police) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यापैकी 180 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. नुकतेच दोन मुलांचे लैंगिक शोषण उघडकीस आलेले बदलापूर हे उल्हासनगर झोन अंतर्गत येते.

अनेक प्रकरणात प्रक्रियात्मक त्रुटींमुळे आव्हान

बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर या शाळेत दोन मुलींचे कथीतरित्या लैंगिक शोषण झाल्याची घटना पुढे आली. त्यानंतर नागरिक आणि पालकांचा संताप अनावर झाला. शहर बंद ठेवण्यात आले. तसेच, रेल रोकोही झाला. त्यानंतर शासन आणि प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील पॉक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या प्रकरणांची आकडेवारी पुढे आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पॉक्सो कायदा अंतर्गत दाखल अनेक  प्रकरणात खटला चालवण्यामध्ये पोलिसांनी महत्त्वपूर्ण आव्हाने अधोरेखित केली आहेत. तपासातील त्रुटी, साक्षीदारांचे शत्रुत्व, विलंबित आरोपपत्रे आणि फॉरेन्सिक पुरावे हाताळण्यात प्रक्रियात्मक त्रुटी हे प्रमुख अडथळे आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 2013 मध्ये शाळेच्या बाथरूममध्ये बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाकडे लक्ष वेधत म्हटले की, या प्रकरणात पाच वर्षांच्या पीडित मुलीच्या पालकांनी आपल्या मुलाला या घटनेच्या आघातापासून वाचवण्यासाठी न्यायालयात खटल्यातून माघार घेतली. (हेही वाचा, Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: बदलापूर आदर्श शाळेत फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रँचची टीम दाखल; चौकशी सुरु)

गुन्हेगार पीडिताच्या परिचयातील

आकडेवारी आणि प्रकरणांच्या अभ्यासातून एक महत्त्वाची घटना पुढे आली. ज्यामध्ये प्रामुख्याने लक्षात आले की, बहुतेक प्रकरणांमध्ये, गुन्हेगार हा मुलाच्या ओळखीचा कोणीतरी असतो. जसे की नातेवाईक किंवा शेजारी अथवा घरोब्याचे संबंध असलेला व्यक्ती. अनेकदा शाळेत नेहमी परिचयात असलेल्या व्यक्तीकडूनही असा घटना घडतात. हा प्रकार पीडितास मोठ्या प्रमाणावर धक्का पोहोचवतो. कारण अशा घटनांमुळे परिचित व्यक्तीकडूनच विश्वासघात केला जातो, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नमूद केले. (हेही वाचा, Akola School Girls Molestation: अकोला येथे शाळकरी मुलींचा विनयभंग; POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; शिक्षकास अटक)

तज्ज्ञांकडून विविध शिफारशी

दरम्यान, लहान मुलांना लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तनापासून रोखण्यासाठी वकिलांनी आणि तज्ञांनी अनेक उपायांची शिफारस केली आहे. ज्यात अधिक महिला वकिलांची नियुक्ती, सुधारित पुरावे संकलन, कायद्याची अंमलबजावणी आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी वर्धित प्रशिक्षण आणि समुदाय जागरूकता कार्यक्रम सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Nashik Sexual Assault Case: नाशिकमध्ये साडेचार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; संशयित आरोपीला अटक)

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ‘पोलीस काका आणि पोलीस दीदी’ उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांशी संलग्न होण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर भर दिला. या कार्यक्रमात पोलिस अधिकारी शाळा आणि महाविद्यालयांना भेट देऊन सुरक्षिततेच्या समस्या सोडवतात. 2023 मधील 1,527 भेटींच्या तुलनेत जुलैपर्यंत शैक्षणिक संस्थांना 1,175 भेटी देऊन, या उपक्रमात या वर्षी वाढ झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif