Thane Crime: मोठ्या घराचे स्वप्न; 23 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 9 वर्षांच्या मुलाची अपहरण केल्यावर हत्या; ठाणे येथील खळबळजनक घटना

मोठ्या घराचे स्वप्न करण्यासाठी एका व्यक्तीने चक्क 9 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आणि त्याच्या पालकांकडे 23 लाख रुपयांची खंडणी मागितली.

Kidnapping | (File Image)

समाजाला हादरवून सोडणारी एक भयानक घटना ठाणे (Thane) जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) येथील गोगेगाव (Goregaon) परिसरात घडली. मोठ्या घराचे स्वप्न करण्यासाठी एका व्यक्तीने चक्क 9 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आणि त्याच्या पालकांकडे 23 लाख रुपयांची खंडणी मागितली. ती मिळाली नसल्याने या मुलाची आरोपीने चक्क हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. इबाद असे पीडित मुलाचे नाव आहे. शेजारी राहणारा स्थानिक शिंपी सलमान मौलवी याने त्याचे अपहरण केले होते. नवीन घर बांधण्यासाठी पैशाच्या हव्यासापोटी सलमानने इबादच्या कुटुंबाकडून 23 लाख रुपयांची खंडणी उकळण्याची योजना आखली. केवळ पैशांच्या हव्यासापोठी त्याने हे कृत्य केले.

इबाद हा मशिदीमध्ये नमाज पडण्यासाठी गेला होता. त्यानंतर बराच वेळ झाला तरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. परिसरात शोधाशोध केल्यावर आणि त्याचा ठावठिकाणा न लागल्याने त्याच्या कुटुंबीयांनी ठाणे जिल्हा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनीही घटनेची नोंद घेत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, इबाद याच्या कुटुंबीयांना एक फोन कॉल आला. आरोपीने कुटुंबीयांकडे इबाद याचे आपण अपहरण केल्याचे सांगितले. तसेच, त्याच्या सुटकेसाठी 23 लाख रुपयांची मागणी केली. आरोपी सलमान याने इबादच्या कुटुंबीयांना धमकी देण्यासाठी त्याचा नेहमीचाच फोन वापरला होता. त्यातील केवळ सीमकार्ड बदलले होते. (हेही वाचा, Thane Crime: ठाण्यमध्ये गुन्ह्यांची मालिगा, ज्वेलर्समधून सोन्याचे 1.5 कोटी रुपयांचे दागीने गायब, रोखड लंपास, जमीन फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल)

पोलिसांनी आलेल्या फोनकॉलची माहिती घेत आरोपीचे स्थळ शोधून काढले. आरोपी त्याचाच घरी आढळून आला. धक्कादायक असे की, आरोपीच्या घराच्या पाठीमागे इबाद याचा मृतदेह पोत्यात भरलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी आरोपीला (सलमान) ताब्यात घेऊन अटक केली.. तसेच, त्याचा भाऊ सफुआन मौलवी यालाही अपहरण आणि हत्येप्रकरणी अटक करण्यात केली.

बदलापूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गोविंद पाटील यांनी सांगितले की, मुख्य संशयित म्हणून सलमानची ओळख पटली असली तरी या क्रूर गुन्ह्यात कुटुंबीयांसह इतर व्यक्तींचा सहभाग निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे. एफआयआर नोंदवण्यात आला आहे, आणि अधिकारी इबाद आणि त्याच्या दुःखी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करत आहेत.

अपहरण प्रकरणामुळे बदलापूर परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनीही या घनेबद्दल मोठ्या प्रमाणार संताप व्यक्त केला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावी अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif