Thane Water Supply News: रस्त्याचे काँक्रिटीकरण! ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरात पुढचे 24 तास पाणीपुरवठा बंद

शहरातील घोडबंदर रोड परिसरात सुरु असलेल्या काही रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे (Concrete Roads) काम सुरु आहे. परिणामी काही जलवाहिन्या स्थलांतरीत करण्यात येणार आहेत.

Water Supply | (Photo credit: archived, edited, representative image)

तुम्ही जर ठाणे शहरात राहात असाल तर, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. आज (मंगळवार, 9 जानेवारी 2024) ठाणे शहरातील काही भागांमध्ये पाणीपूरवठा (Thane Water Supply) 24 तासांसाठी बंद राहणार आहे. शहरातील घोडबंदर रोड (Ghodbunder Road News) परिसरात सुरु असलेल्या काही रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे (Concrete Roads) काम सुरु आहे. परिणामी काही जलवाहिन्या स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे सदर भागातील पाणीपूरवठा खंडीत (Water Supply News) केला जाणार आहे. अर्थता 24 तासानंर पाणीपूरवठा पूर्ववत केला जाईल. मात्र, नागरिकांनी तोवर पाणी साठवून ठेवावे किंवा काटकसरीने वापरावे, असे अवाहन ठाणे पालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, अशी आपेक्षाही पालिकेद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

काँक्रिटीकरण सुरु असलेला रस्ता

घोडबंदर येथील आनंदनगर परिसर ते चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क ते न्यू होरायझन स्कूल

कामाचा कालावधी

मंगळवार (9 जानेवारी 2024) ते बुधवार (11 जानेवारी 2024) सकाळी 11 वाजेपर्यंत

पाणीपुरवठा बंद असलेला कालावधी

एकूण-24 तास

जलपूरवठा बंद ठेवण्याचे कारण

रस्त्यांचे काँक्रिटीकरण हे जलपूरवठा बंद ठेवण्याचे प्रमुख कारण आहे. ठाणे महापालिका द्वारे देण्यात आलेल्या माहितनुसार या कामामुळे 450 मिमी आणि 300 मिमी व्यासाच्या जलवाहिन्या बाधीत होत आहेत. परिणामी त्या स्थलांतरीत केल्या जातील. (हेही वाचा, PMC Ultimatum to Government Bodies: थकीत पाणीपट्टी भरा! अन्यथा पाणी पुरवठा खंडित करु; पुणे मनापाकडून सरकारी संस्थांना अल्टिमेटम)

पाणीपुरवठा खंडीत झाल्यामुळे जलटंचाई उद्भवणारा परिसर

घोडबंदर रोड, आनंदनगर, कासारवडवली गाव (काही भाग), एव्हरेस्ट वर्ल्ड संकुल, यशराज पार्क संकुल, होरायझन हाइट संकुल, कृष्णा ग्रीन लँड पार्क संकुल, विजयपार्क संकुल, राम मंदिर रोड परिसरातील गृहसंकुले, भवानीनगर व ट्रॅफिक पार्क जलकुंभावरील उन्नती वुड संकुल, ट्रॉपिकल लगुन संकुल, विजय विलास संकुल, वाघबीळ जुना गाव, स्वस्त‍िक रेसीडेन्सी संकुल, हिल स्प्रिंग संकुल सर्व्हिस रोड,कासारवडवली नाका सर्व्हिस रोड. (हेही वाचा, Mumbai Water Storage: मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ)

दरम्यान, ठाणे महापालिकेने वरील परिसरात पुढचे 24 तास पणीपुरवठा खंडीत होईल याची माहिती आगाऊ दिली होती. तसेच, पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पुढचे एक दोन दिवस या परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असेही पाकिलेने म्हटले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अधिकृतरित्या 24 तास पाणीपुरवठा खंडीत झाल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात मात्र जवळपास तीन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. पाणीपुरवठा पूर्ववत झाला तरी जलवाहीन्यांमध्ये पुरेशा दाबाने पाणी चढण्यासाठी काही कालावधी लागतो. परिणामी नागरिकांना नळातून हवा येणे, पाणी गडूळ येणे, कमी दाबाने येणे, अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते.