Thane: दिव्यात 3 दिवसांपूर्वी नाल्यामध्ये पडलेल्या मुलाचा मुंब्रा खाडीवर तरंगताना आढळला मृतदेह!

हा पूल दिव्यापासून 8 किमी दूर आहे.

Dead body | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

ठाण्यामध्ये 17 वर्षीय मुलाचा मृतदेह मुंब्रा खाडीवर (Mumbra creek)आढळला आहे. 3 दिवसांपूर्वी नाल्यात पडलेल्या मुलाचा मृतदेह आता समोर आला आहे. दिव्यामध्ये तो नाल्यात पडला होता त्यानंतर आता तो मुंब्रा मध्ये आढळला आहे. 28 जूनला झालेल्या मुसळधार पावसामध्ये ही दुर्घटना घडली. त्यानंतर अग्निशमन दल, रिजनल डिझास्टर मॅनेजमेंट सेल त्याच्या मृतदेहाचा शोध घेत होते. शनिवार 1 जुलै दिवशी मुंब्रा खाडीवर रेल्वे पूलाजवळ त्याचा मृतदेह तरंगताना दिसला. हा पूल दिव्यापासून 8 किमी दूर आहे. मुलाचा मृतदेह मोठ्या प्रमाणात डिकम्पोज्ड झाला आहे. मात्र त्याची ओळख पटवण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे भागामध्ये मागील काही दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे. सध्या काही दिवस यलो अलर्ट आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान आवश्यकता नसेल तर भरपावसात बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दिव्यामाधील ही दुर्घटना झाली आहे त्यामुळे पुन्हा रस्त्यांच्या दुर्देशेचा प्रश्न समोर आला आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Rain Update: मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी, आज कोकणात पावसाचा यलो अलर्ट.

2017 मध्ये मुंबई मध्येही अशाच प्रकारे एका डॉक्टराचाही देखील पडून मृत्यू झाला होता. डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. मुंबई मध्येही आजही अनेक ठिकाणी गटारांची झाकणं तुटल्याने ती उघडी असल्याचं पहायला मिळालं आहे. मॅनहोल्सला जाळी नसल्याने अशा दुर्घटना होत असल्याचं समोर आलं आहे.