Bhiwandi Godown Collapsed: भिवंडीत गोदामाचा पहिला मजला कोसळला, 7 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

या घटनेप्रकरणी ढिगाऱ्याखाली 7 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

Bhiwandi Godown Collapsed: ठाण्यातील भिवंडीत मनकोली मधील हरिहर कंपाउंट मध्ये एका गोदामाचा पहिला मजला कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी ढिगाऱ्याखाली 7 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेले सर्वजण गोदामात काम करणारे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि एनडीआरफचे पथक दाखल झाले आहे.(महाराष्ट्र: कराड येथे दोन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू, तिघेही होते पुण्यातील पैलवान)

भिवंडीतील अग्निशमन दलाच्या विभागातील तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या व्यक्तीरिक्त ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी बचाव कार्य सुरु झाले आहे. त्यासाठी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पथक, टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचले आहेत. अद्याप कोणात्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नसल्याची माहिती दिली जात आहे.(Kalyan Railway Station: कल्याण रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेतून उतरणाऱ्या तरूणाचा थोडक्यात बचावला जीव; पाहा व्हिडिओ)

Tweet:

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भिवंडी मध्येच एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग नेमकी कशामुळे लागली याबद्दल काही स्पष्ट झाले नव्हते. तर आग लागली त्यावेळी 30 ते 40 कर्मचारी गोदामात अडकल्याची माहिती दिली होती. पण त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.



संबंधित बातम्या