महाराष्ट्र: कराड येथे दोन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू, तिघेही होते पुण्यातील पैलवान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेले ते तिघेही पुण्यातील प्रसिद्ध पैलवान (Wrestlers in Pune) असल्याचे समोर आले आहे. तसेच या भीषण अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र: कराड येथे दोन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू, तिघेही होते पुण्यातील पैलवान
Car Accident Near Karad (Photo Credits: Twitter/ANI)

पुणे-बंगळूरू महामार्गावर (Pune Banglore Highway) कराडजवळ (Karad) काही तासांपूर्वी एक भीषण अपघात झाला आहे. यात 2 कारची एकमेकांना धडक लागली असून यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेले ते तिघेही पुण्यातील प्रसिद्ध पैलवान (Wrestlers in Pune) असल्याचे समोर आले आहे. तसेच या भीषण अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या दोन मोटारींमध्ये हा भीषण अपघात झाला असून यामध्ये तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.हेदेखील वाचा- मुंबई: सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल रेल्वेच्या दुस-या कोचची ट्रॉली रुळावरून घसरली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

महामार्गावर कराड जवळच्या आटके टप्पा येथे हा अपघात झाला असून अपघातग्रस्त एक मोटार कोल्हापूरवरुन पुण्याच्या दिशेने जात असताना एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात पाठीमागून वेगात आलेल्या मोटारीने पुढे असणाऱ्या मोटारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पुढील मोटार पलटी झाली.

यातील जखमींना कराडच्या कृष्णा हॅास्पिटल येथे दाखल करणात आले आहे. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरु करण्यात आले आहेत. घटनास्थळी महामार्ग पोलीस तसेच कराड पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2021 12:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).