Thane: किरकोळ वादातून भररस्त्यात 20 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला; 2 जण अटकेत

ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भररस्त्यात दुचाकीस्वारावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. श्याम धीरे (40) असे आरोपीचे नाव असून त्याने सुभम रणदिवे (20) याच्यावर चाकूने वार केला.

Thane: किरकोळ वादातून भररस्त्यात 20 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला; 2 जण अटकेत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

ठाण्यातून (Thane) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. किरकोळ वादातून भररस्त्यात 20 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, श्याम धीरे (40) असे आरोपीचे नाव असून त्याने सुभम रणदिवे (20) याच्यावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Thane Crime: ठाणेमध्ये मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीचा शुल्लक कारणावरून हॉटेल मालकावर चाकूहल्ला, एकास अटक)

सोमवारी रात्री 10 वाजता ही घटना घडली. सुभम त्याच्या स्कुटरवरुन काही किराणा सामान घेऊन जात असताना त्याची स्कुटर आरोपी धीरेच्या बाईकला आदळली. त्यानंतर दोघात वाद सुरु झाला. शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. रणदिवे आणि धीरे यांच्यात वाद सुरु असताना घटनास्थळी उपस्थित दोन महिलांनी धीरे यांना साथ दिली. या सर्व गदारोळात त्यांच्यापैकी एकाने चाकू काढून रणदिवेच्या पोटात खुपसला. रणदिवे जागीच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रणदिवेला तिथेच सोडून आरोपींनी तेथून पळ काढला. (Pune Murder: पुण्यामध्ये 70 वर्षीय महिलेची हत्या करत दागिने आणि पैसे लुटले, दोघांना अटक)

रस्त्यावरील लोकांनी रणदिवे ला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहेत. तसंच तिसऱ्या आरोपीचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, किरकोळ वादातून हत्या, हल्ला करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी दोन गटातील वाद मिटवण्यास गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला करुन आरोपी फरार झाल्याची घटना उल्हासनगर मधून समोर आली होती. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2021 07:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).