Thane Shocker: प्ले झोनमध्ये खेळत असताना पाच वर्षाचा मुलाचा मृत्यू, डोंबिवलीतील घटना
बिवलीतील मानपाडा परिसरातील रिजन्सी अनंतम सोसायटीट्या प्ले झोनमध्ये खेळत असताना एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
Thane Shocker: डोंबिवलीतील मानपाडा परिसरातील रिजन्सी अनंतम सोसायटीट्या प्ले झोनमध्ये खेळत असताना एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी सुरु केली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. खेळत असताना मुलगा जमिनीवर कोसळला हे पाहून त्याच्या आईने आणि स्थानिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयता दाखल केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
मीडिया रिपोर्टनुसार, डोंबिवलीतील रिजन्सी अनंतन गृहसंकुलात सक्षम उंडे कुटुंबियांसोबत राहत होता. परिसरातील प्ले झोन परिसरात खेळत असताना संध्याकाळी अचानक ही घटना घडली. खेळत असताना सक्षम अचानक जमिनीवर पडला. पडल्यानंतर पुन्हा उठला नाही म्हणून आईने आणि स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याल मृत घोषित केले. त्यांच्या प्रयत्नानंतरही उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते.
पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली. आकस्मित मृत्यूची नोंद घेण्यात आली. पोलिसांनी प्ले झोन मध्ये केअर टेकरची चौकशी केली. सक्षम हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, ज्यामुळे परिस्थितीच्या गंभीर शोकांतिकेत भर पडली. परिसरात या घटनेमुळे शांतता पसरली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2023 08:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

