Thane Shocking: खळबळजनक! ठाणे येथे 19 वर्षीय तरुणावर लैंगिक अत्याचार; चौघांविरोधात गुन्हा दाखल
या धक्कादायक प्रकारानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
बॉलीवूडमध्ये काम शोधण्यासाठी आलेल्या 19 वर्षीय तरूणावर लैंगिक अत्याचार (Sexually Abused) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्यात रविवारी घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी चौंघाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. पीडित व्यक्ती आणि आरोपी यांच्यात फेसबूकवर ओळख झाली होती. दरम्यान, बॉलिवूडमध्ये काम देतो, असे आरोपीने पीडित व्यक्तीला सांगितले. या निमित्त दोघांची भेटही झाली होती. त्यानंतर आरोपीने पीडित व्यक्तिला तुझी इतर मित्रांशी भेट घडवून देतो, असे सांगत भेटण्यासाठी बोलावले. मात्र, भेटायला गेलेल्या पीडित व्यक्तीवर मुख्य आरोपीसह इतर तिघाजणांनी मिळून लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक प्रकारानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पुनिक शुक्ला असे मुख्य आरोपीचे नाव आहे. शुक्ला याची फेसबूकवर गेल्या काही दिवसांपूर्वी मॉडेल असणाऱ्या एका तरुणासोबत ओळख झाली होती. दरम्यान, शुक्लाने त्या तरूणाला बॉलिवूडमध्ये संधी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या दोघांची भेटही झाली. त्यावेळी शुक्लाने तरुणाला तुझी इतर मित्राशी भेट घडवून देतो, असे सांगितले. त्यानुसार, रविवारी संध्याकाळी शुक्ला या तरुणाला त्याच्या एका मित्रासोबत भेटला. हे दोघे या तरुणाला एका निर्जनस्थळी असणाऱ्या इमारतीच्या गच्चीवर घेऊन गेले. काही वेळाने तिथे आणखीन दोनजण आले. या चौघांनी मिळून या तरुणावर लैंगिक अत्याचार केला. मात्र, त्यावेळी या तरुणाने शुक्लासह त्याच्या मित्रांना विरोध केला म्हणून या चौघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नव्हेतर, या चौंघानी संपूर्ण घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद केला. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या संदर्भात मिड डे ने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Mira Road: शस्रांचा धाक दाखवत चार चोरट्यांकडून ज्वेलरीच्या दुकानातून 2 कोटी सोन्यासह डायमंडची चोरी
या घटनेनंतर पीडित व्यक्तिने आपले घर गाठले. दरम्यान, नातेवाईकांनी त्याला विश्वासात घेऊन घडलेल्या प्रकारासंदर्भात विचारले असता त्याने सर्व घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या सर्व आरोपी फरार असून स्थानिक पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.