Thane: नवरदेवाची कार वरातीत घुसली, 12 जणांना चिरडून लग्नमंडपात थांबली; ठाणे येथील घटना
परंतू कधी कधी हा उत्साह इतका भारी पडतो की, एखाद्याच्या जीवावरही बेततो. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर (Ulhasnagar) शहरात असाच काहीसा प्रकार घडला. उल्हासनगरमध्ये लग्नाच्या वरातीत चक्क नवरदेवाचीच कार घुसली. ज्यामुळे एकदोन नव्हे तर 12 वऱ्हाडी जखमी झाले.
लग्न (Marriage) म्हटलं की उत्साह हा आलाच. परंतू कधी कधी हा उत्साह इतका भारी पडतो की, एखाद्याच्या जीवावरही बेततो. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर (Ulhasnagar) शहरात असाच काहीसा प्रकार घडला. उल्हासनगरमध्ये लग्नाच्या वरातीत चक्क नवरदेवाचीच कार घुसली. ज्यामुळे एकदोन नव्हे तर 12 वऱ्हाडी जखमी झाले. अर्थातच लग्नाचा समारंभ असल्याने इतर वाहनेही तत्काळ उपलब्ध झाल्याने या जखमींना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी या वऱ्हाडींवर आवश्यकतेनुसार उपचार करुन डिस्चार्ज दिला. दरम्यान, घडल्या प्रकारानंतर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, उल्हासनगर येथील शांतीनगर परिसरात असलेल्या हॉटेल प्रवीण इंटरनॅशनलमध्ये एका लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी नवरदेवाचे वऱ्हाड पार्कींगध्ये पोहोचले. लग्नाचा उत्साह सुरु होताच. नवरदेवाच्या कारसमोर नातेवाईक महिला-पुरुष आनंदाने बेहोश होऊन नाचत होते. असा वेळी नवरदेवाच्या कारने अचानक वेग घेतला आणि कार समोरच्या गर्दीत घुसली. ज्यामुळे जवळपास बारा लोक जखमी झाले. जखीमंमध्ये महिलांचा समावेश अधिक होता. घडल्या प्रकारामुळे घटनास्थली एकच गोंधळ उडाला. महिला घाबरल्या, मुले गोंधळली तर पुरुष काय घडले हे पाहण्यासाठी पुढे धावले. त्यातील काही पुरुषांनी मदत आणि बचाव कार्य हाती घेतले. (हेही वाचा, Jalna Sexually Abuse Case: मेव्हणीवर दाजी फिदा, साडूला फोन करुन म्हणतो 'मला आवडते तुझी बायको'; पोलिसांकडून थेट अटक; जाणून घ्या प्रकरण)
दरम्यान, डॉक्टरांनी 12 वऱ्हाडींवर उपचार केले. त्यातील 11 जणांना डिस्चार्ज मिळाला. मात्र, एकाची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे समजते.त्याच्यावर उल्हासनगर येील मीरा एन एक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार आणि कारचालकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकारात कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.