Yeola Manmad Road Accident: येवला-मनमाड रोडवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर जखमी
या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Yeola Manmad Road Accident: नाशिक जिल्ह्यात येवला-मनमाड रोडवर (Yeola Manmad Road) स्विफ्ट गाडीला भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास येवला तालुक्यातील धामोडे येथील स्विफ्ट गाडीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनाचा चक्काचूर झाला. या अपघातात मृत्यू झालेले तिघेही एकमेकांचे नातेवाईक होते.
येवला-मनमाड रोडवरील सावरगाव (Savargaon) येथे हा अपघात झाला. शिफ्ट गाडीमध्ये पुढच्या बाजूला बसलेले दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर येवला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Maharashtra: राज्यातील साखर कामगारांचे पगार वाढ, सातवा वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी येत्या 30 नोव्हेंबर पासून बेमुदत संपावर जाणार)
दरम्यान, शनिवारी नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात झाला होता. हे वाहने पुणे शहराकडून नाशिकच्या दिशेने चालले होते. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात एका तृतीयपंथीयाला प्राण गमवावे लागले आहेत. तसेच मोटारीतील पती-पत्नीसह दुसऱ्या मोटारीतील एक तरुण जखमी झाला होता. या अपघातानंतर नाशिककडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही खोळंबळी होती. या अपघातात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.