Yavatmal Accident: यवतमाळ- पांढरकवडा मार्गावर भीषण अपघात; वाहन झाडाला धडकल्याने 3 जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर (Yavatmal- Pandharkawada Road) एका वाहनाने झाडाला धडक दिल्याची (Road Accident) घटना घडली आहे.

Accident Representational image (PC - PTI)

संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी झुंज देत असताना यवतमाळ येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर (Yavatmal- Pandharkawada Road) एका वाहनाने झाडाला धडक दिल्याची (Road Accident) घटना घडली आहे. या भीषण अपघात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जण जखमी झाल्याचे समजत आहे. जखमीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव येथील चौघेजण एका वाहनातून यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरून जात होते. मात्र, पारवा गावाजवळ पोहचल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर त्यांचे वाहन एका झाडाला जाऊन जोरात धडकले. हा अपघात इतक भयंकर होती की, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकाला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Pune: बनावट Remdesivir Injections विकणाऱ्या 4 जणांना बारामती मधून अटक

महाराष्ट्रसह संपूर्ण देशात अपघातांच्या मालिका सुरुच आहेत. यापूर्वी जालना जिल्ह्यातील संभाजीनगर- जालना महामार्गावरील बदनापूर शहरालगत असलेल्या दुधना नदीच्या पुलावर बुधवारी (14 एप्रिल) पहाटे पाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला होता. झोपेच्या धुंदीत जालन्याहून संभाजीनगरकडे जाणारा टेम्पो पुलावरून खाली कोसळला होता. यात चालकाचा मृत्यू झाला होता. तर, एक जण गंभीर जखमी झाला होता.