Mumbai Pune Express Accident: बोरघाटात भीषण अपघात, तीन वाहनांच्या धडकेत ३ जण ठार, ८ जखमी
यात आज बोरघाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
Mumbai Pune Express Accident: मुंबई पुणे महामार्गावर अपघाताची (Accident) मालिका सुरु आहे. यात आज बोरघाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तीन वाहनांची एकमेकांना धडक झाल्याने हा अपघात घडून आला. कार आणि दोन वेगवेगळे ट्रक यांच्यात धडक झाली आहे. हा अपघात शुक्रवारच्या पहाटे घडून आला. अपघातात आणखी ८ जण जखमी झाले. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक सेवा विस्कळीत झाली होती. (हेही वाचा- शनिवारी रात्री भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते सीएसएमटी लोकल सेवा राहणार बंद)
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजता भरधाव वेगात असलेल्या दोन ट्रकचा आणि कारची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यात तीन वाहनांचे नुकसान झाले. अपघात झाल्यानंतर तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त अडकलेल्यांना बाहेर काढले. जे जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात तीन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. एका ट्रकमध्ये कोंबड्या होत्या तर दुसऱ्या ट्रकमध्ये पाईप. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील कारवाई सुरु केली. जखमींना कामोठे येथील एमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिस याचा शोध घेत आहे. काही वेळाने पोलिसांच्या मदतीने अपघातस्थळावरून वाहतुक सेवा सुरळीत झाली.