Maharashtra Board SSC, HSC Results 2020: दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली नाही: विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये; शिक्षण मंडळाचं आवाहन

निकालासंदर्भात सोशल मीडियावरुन पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेऊ नये, असं आवाहन शिक्षण मंडळाच्या सचिवांनी केलं आहे.

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (PC - Twitter)

Maharashtra Board SSC, HSC Results 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालाची (SSC Results/ HSC Results ) तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. निकालासंदर्भात सोशल मीडियावरुन पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेऊ नये, असं आवाहन शिक्षण मंडळाच्या सचिवांनी केलं आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचे संक्रमण नसताना दहावी, बारावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षांचा निकाल जूनमध्ये जाहीर केला जातो. मात्र, अद्याप दहावी-बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या सोशल मीडियावर दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात अनेक अफवा पसरवण्यात येत आहेत. या अफवेनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून खुलासा करण्यात आला आहे. (हेही वाचा - Maharashtra Board SSC, HSC Results 2020: 12वी आणि 10वी चे बोर्डाच्या परीक्षांचे निकाल यंदा कोरोना संकटामुळे जुलै महिन्यात लागणार?)

दरम्यान, जून महिना लागल्यानंतर दहावी-बारावीच्या निकाची उत्सुकता शिगेला पोहोचते. परंतु, यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार? असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारला जात आहे. यातील अनेकजण सोशल मीडियावरील अफवांचे बळी ठरत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी यंदा निकाल आणखी लांबणीवर पडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.