विदर्भातील चंद्रपूर येथे काल 48° तापमानासह उच्चांकी तापमानाची नोंद; पहा काय आहे आजचे तापमान
काल विदर्भातील चंद्रपूर येथे 48 डिग्री सेलियल्स तापमानाची नोंद झाली.
महाराष्ट्रासह विदर्भ तापतो आहे. काल (29 मे) विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur) येथे 48 डिग्री सेलियल्स तापमानाची नोंद झाली. तर ब्रह्मापूरी (Brahmpuri) आणि अमरावती (Amravati) येथे अनुक्रमे 47.5 आणि 46.4 डिग्री सेलियल्स तापमान होते. येत्या दोन दिवसांत विदर्भात तापमानाचा पारा वाढणार, हा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज अचूक ठरला आहे.
48 डिग्री सेलियल्स तापमानासह चंद्रपूरात काल उच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर नागपूर मध्ये मागील 10 वर्षातील दुसऱ्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. काल नागपूरात 47.5 डिग्री सेलियल्स तापमान होते. (नागपूर शहरात मागील 10 वर्षातील दुसरे उच्चांकी तापमान; विदर्भात उष्णतेची लाट)
ANI ट्विट:
पहा आजचे तापमान:
विदर्भातील जिल्ह्यातील आज देखील पारा 40° च्या वर आहे.
नागपूर- 44°
चंद्रपूर- 44°
भंडारा- 42°
गोंदिया- 42°
वर्धा- 45°
अमरावती- 44°
अकोला- 44°
वाशीम- 42°
यवतमाळ- 44°
विदर्भातील वाढत्या उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसंच तापत्या महाराष्ट्राला आता मान्सूची प्रतिक्षा आहे.