Teacher Recruitment: राज्यात लवकरच भरली जाणार शिक्षकांची सुमारे 30 हजार पदे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिक्षक हे भावी पिढीला आकार देण्याचे, संस्कारित करण्याचे अतिशय मोलाचे काम करत असतात. शिक्षकांचे समाजामध्ये मोलाचे योगदान आहे. समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षकांवर जास्त बंधने लादली जाणार नाहीत.

Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे 30 हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या 17 व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिक्षक हे भावी पिढीला आकार देण्याचे, संस्कारित करण्याचे अतिशय मोलाचे काम करत असतात. शिक्षकांचे समाजामध्ये मोलाचे योगदान आहे. समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षकांवर जास्त बंधने लादली जाणार नाहीत. शासनाने गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये शेतकरी, शिक्षक, कष्टकरी, कामगार तसेच विद्यार्थीं या सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. जे निर्णय शासनाने घेतले आहेत ते निर्णय हे राज्याचे हित लक्षात घेऊनच घेतले आहेत. सर्व सामान्य घटक वंचित राहू नये, असे केंद्रबिंदू मानून निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील घटकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णय घेतले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिक्षकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. शिक्षक हे ज्ञानदानाचे काम करत असतो. शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सर्वेक्षणामध्ये शिक्षकांनी मोठी झेप घेतली आहे. यात सरकारी शाळांचा वाटा खूप मोठा आहे. पालक व समाजाचा सरकारी शाळेवरील विश्वास देखील आता वाढत चालला आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात कमी नाही.  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी कामगिरी निर्देशांकात एकूण 1000 गुणांपैकी महाराष्ट्राला 928 गुण मिळाले आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. यामध्ये शिक्षकांचे मोठे योगदान आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेवरील शिक्षणावर भर दिला जाईल. इंग्रजी गणित व विज्ञान या विषयांची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी. यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण हे भविष्य काळातील  सुवर्णसंधी  आहे. या धोरणानुसार राज्यातील सर्व मुला-मुलींना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने देखील केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार दिशादर्शक काम करुन सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत. शिक्षण व्यवस्था दर्जेदार करण्यासाठी जी रिक्त पदे आहेत ती भरण्यात येणार आहेत. तसेच केंद्र प्रमुखाची रिक्त पदे भरण्याचे काम सुरु आहे. शिक्षकांच्या मागणीच्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: Sanjay Raut Statement: संजय राऊतांनी घेतला भाजपचा खरपूस समाचार, म्हणाले - ते ढोंगी आहेत)

मंत्री केसरकर म्हणाले, केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा शिक्षक भरती झाल्यानंतर येत्या 6 महिन्यांत भरल्या जातील. शिक्षकांच्या मानधनात वाढ व्हावी म्हणून मागणी होती. ती मागणी राज्य शासनाने पूर्ण केली आहे. विविध प्रवर्गातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ केली आहे. मंत्री पुढे म्हणाले विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येईल. कोणीही विद्यार्थीं गणवेश अभावी वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Orange Gate–Marine Drive Twin Tunnel Project: मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, मरिन ड्राईव्हला सहा पदरी समांतर सहा पदरी रस्ता, दुहेरी बोगदा प्रकल्पाच काम लवकरच होणार सुरू

Maharashtra CM Fellowship Program: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 5 मे 2025 पर्यंत करू शकाल अर्ज; मिळणार दरमहा 61,500 रुपये छात्रवृत्ती, जाणून घ्या निकष, अनुभव, पात्रता, निवड प्रक्रिया

RRB ALP Recruitment 2025: रेल्वेमध्ये होणार तब्बल 9,970 असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; आजपासून करू शकाल अर्ज, जाणून घ्या पात्रता, अर्ज व निवड प्रक्रिया

BMC To Hire Full-Time Professors: बीएमसी KEM, Sion, Nair आणि Cooper हॉस्पिटलमध्ये करणार 700 हून अधिक पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती; कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी मोठा निर्णय

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement