Mumbai Crime: गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना; अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक
पीडित मुलीने समुपदेशन सत्रादरम्यान किशोरीने तिच्या मानसिक आणि शारिरिक छळा संबंधाबद्दल माहिती दिली.
Mumbai Crime: मुंबईत एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आले आहे. पीडित मुलीने समुपदेशन सत्रादरम्यान किशोरीने तिच्या मानसिक आणि शारिरिक छळा संबंधाबद्दल माहिती दिली. त्यानंतर समुपदेशकाने शाळेतच्या इतर शिक्षकांना आणि पालकांना या बद्दल माहिती दिली. पालकांनी मुलीच्या तक्रारीनुसाप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. गावदेवी मंदिराजवळ भऱलेल्या समुपदेशन सत्रादरम्यान घटना उघडकीस आली. पीडित मुलगी 9 वीचे शिक्षण घेत आहे. (हेही वाचा- कोल्हापुरातील 21 वर्षीय तरुणीचा रेबीजने मृत्यू; अँटी रेबीज लसीकरण कोर्स पूर्ण केल्यानंतर 3 दिवसांनी संपली मृत्यूशी झूंज
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने पोलिसांना तक्रारीत सांगितले की, जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत आरोपीने तिचा सतत पाठलाग केला आणि त्यानंतर जबरदस्तीने विनयभंग केला. त्यानंतर या गोष्टीची भीती वाटू लागली आणि पीडितेने भीतीपोटो कोणावरही विश्वास ठेवला नाही. यानंतर ती प्रचंड मानसित ताण सहन करून लागली. समुपदेशकांनी देखील पोलिसांना याची माहिची दिली.
या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या तक्रारीच्या आधारे आरोपी शिक्षकाला लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये अटक करण्यात आली. शिक्षकाला न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शिक्षकाच्या या कृत्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतवर प्रश्न उभारला आहे. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.