Tamil Nadu: 17 वर्षीय मुलगी गर्भवती; 12 वर्षीय मुलावर पॉक्सो कायद्याखाली गुन्हा, जाणून घ्या प्रकरण

एका 17 वर्षीय मुलीला गर्भवती केलेप्रकरणी या मुलाविरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rape | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

तामिळनाडू (Tamil Nadu) येथील तंजावूर येथे चक्क एका 12 वर्षीय मुलाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत (Tamil Nadu) गुन्हा दाखल झाला आहे. एका 17 वर्षीय मुलीला गर्भवती केलेप्रकरणी या मुलाविरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिच्या आईवडीलांनी तिला डॉक्टरांकडे नेले असता झालेल्या वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे पुढे आले. मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात येताच आई-वडीलांना मोठा धक्का बसला.

तामिळनाडू पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णलयात दाखल करण्यात आलेली मुलगी नऊ महिन्यांची गर्भवती आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. तंजावूर येथील महिला पोलीस स्टेशनला रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे बाळंतपण करण्यात आले आहे. एका 12 वर्षीय मुलामूळे या मुलीला दिवस गेले आहेत. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत असलेल्या विविध कलमांनुसार पोलिसांनी या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याची माहिती आहे. (हेही वाचा, Shocking! चार जणांचा घोरपडीवर सामुहिक बलात्कार; घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आरोपींना अटक)

दरम्यान, पोलिसांनी तपास सुरु केला आहे की, ही मुलगी गर्भवती होण्यासाठी केवळ हा 12 वर्षांचा मुलगाच जबाबदार आहे का? की या मुलाचे नाव पुढे करुन या मुलीवर इतरच कोणी प्रौढ व्यक्तीने अत्याचार केले आहेत? याबाबत पोलीस तपास करत आहेत.