Swamini Savarkar Passes Away: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुनबाई स्वामिनी सावरकर यांचं निधन; रणजित सावरकरांना मातृश्रोक

स्वामिनी या हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमराव सावरकर यांच्या पत्नी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjeet Savarkar) यांच्या मातोश्री होत्या.

Swamini Savarkar | Facebook

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या सुनबाई स्वामिनी सावरकर (Swamini Savarkar) यांचे आज पुण्यामध्ये निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याचं सांगण्यात आले आहे. स्वामिनी या हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमराव सावरकर यांच्या पत्नी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjeet Savarkar) यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान स्वामिनी सावरकर यांनी आयुष्यभर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा जपला. पती विक्रमराव सावरकर यांना त्यांनी संघटन कार्यात साथ दिली. 'प्रज्वलंत' या सावरकरांच्या विचारांवरील मासिकाचे कामकाज स्वामिनी सावरकर सांभाळत होत्या. मुरबाड (ठाणे) येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूल उभे करण्यात तसेच संस्थेचे काम सुरळीत सुरू ठेवण्यामध्ये त्यांचा कायम सक्रीय सहभाग होता. विक्रमराव सावरकर यांच्या 'युद्ध आमुचे सुरु' (नवी आवृत्ती- मनःस्वी) तसेच 'कवडसे' या पुस्तकांसाठीही त्यांनी काम केले होते. स्वामिनी सावरकर यांचे 'यशोगीत सैनिकांचे' हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवरील कार्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर होत्या. नक्की वाचा:  वीर सावरकर यांचे 'हे' विचार आहेत देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण; वाचून तुम्हालाही मिळेल प्रेरणा.

स्वामिनी सावरकर या पूर्वाश्रमीच्या मंदाकिनी गोखले होत्या. त्यांचा जन्म 19 डिसेंबर 1939 चा आहे. नागपूर मध्ये पांडुरंग गोखले यांच्या घरात जन्म झालेल्या मंदाकिनी नंतर नारायणराव सावरकर यांचे पुत्र विक्रमराव यांच्यासमवेत विवाहबद्ध होऊन स्वामिनी सावरकर झाल्या. पृथ्वीराज आणि रणजित सावरकर ही त्यांची दोन मुलं, ज्यापैकी पृथ्वीराज यांचे नुकतेच निधन झाले तर रणजित हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आहेत.