Bhusaval Crime: भुसावळ येथील टोळक्यांचा दोन सख्खा भावांवर जीवघेणा हल्ला, दोघांचा जागीच मृत्यू, आरोपी फरार
भुसावळ येथ एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.टोळक्यांनी दोन सख्खा भावांवर हल्ला केला आहे. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
Bhusaval Crime: भुसावळ येथील परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन सख्खा भानांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भुसावळ येथील कंडारी येथील ही घटना आहे. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घटनास्थळा वरून फरार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलीसांनी आरोपीला पकडण्यासाठी पथके नेमली आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, या घटनेत आणखी दोन जण जखमी झाले आहे. शांताराम भोलानाथ सांळुखे आणि राकेश भोलानाथ सांळुके असं या घटनेत मृत झालेल्या भावांची नावे आहेत. तसेच विकी सपकाळे आणि सागर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे तालुका हादरलं आहे.
शुक्रवारी रात्री काही जणांच्या टोळक्याने येवून भावांवर हल्ला केला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या व्यवसायिक वादातून हे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेच शांताराम आणि राकेश दोघे ही गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झाल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेत आणखी दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी शांताराम आणि राकेशला मृत घोषित केले. पोलीसांनी या घटनेची चौकशी करता हल्लेखोरांची ओळख पटली आहे आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहे. पोलीसांनी आरोपीला पकडण्यासाठी पथके नेमली आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2023 10:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

