Antilia Case: सीन रिक्रिएटसाठी सचिन वाझे यांना घेऊन NIA टीमने केला Local Train ने प्रवास; पहा व्हिडिओ
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी अँटिल्याजवळ जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणात अटक झालेल्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडून एनआयए दररोज नवीन रहस्ये उघडकीस आणत आहे.
Antilia Case: मुंबई पोलिसांचे निलंबित अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) आणि एनआयएच्या टीमने सोमवारी रात्री उशिरा मुंबईतील सीएसटी (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) रेल्वे स्टेशन गाठले. मनसे हिरेन खून प्रकरणात वाझे आरोपी आहे. यावेळी एनआय टीमने सीन रिक्रिएट केला आणि वाझे यांना सीसीटीव्ही फुटेजसह पुरावे सिद्ध करण्यासाठी प्लेटफॉर्म क्रमांक चार आणि पाच वर नेले. यावेळी, फॉरेन्सिक्सची टीमही हजर होती. प्रक्रिया संपल्यानंतर टीमने सचिन वाझे यांना गाडीत बसवून पुन्हा परत नेले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्टेशनजवळील एक व्यक्ती सचिन वाझे असल्याचा एनआयएला संशय आहे. यामुळे पथकाने स्थानकातील देखावा तयार केला. या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी अँटिल्याजवळ जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणात अटक झालेल्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडून एनआयए दररोज नवीन रहस्ये उघडकीस आणत आहे. शनिवारी विशेष कोर्टाने सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीची मुदत 7 एप्रिलपर्यंत वाढविली. (वाचा - अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी वसूली प्रकरणी लावण्यात आलेल्या आरोपासंदर्भात 6 एप्रिलला CBI चे अधिकारी तपासासाठी मुंबईत येणार)
एनआयएचे वकील, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह म्हणाले की, एजन्सीने डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डिंग (डीव्हीआर) आणि सीसीटीव्ही फुटेज असणारे लॅपटॉप जप्त केले आहे. याची चौकशी होणे आवश्यक आहे. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर वाझे यांच्या कोठडीत 7 एप्रिलपर्यंत वाढ केली.
काही दिवसांपूर्वी अँटिल्या प्रकरणात एनआयएला मोठ यश मिळालं होतं. याप्रकरणी एजन्सीने एका महिलेला ताब्यात घेतले होते. ही महिला सचिन वाझे यांच्याबरोबर फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये दिसली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला मुख्य आरोपी सचिन वाझे यांची जवळची सहकारी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 16 फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझेसोबत एक महिला दिसली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)