IPL Auction 2025 Live

पालघर: अरबी समुद्रात संशयास्पद बोट; सागरी किनारपट्टीवर हाय अलर्ट

श्रीलंकेत नुकताच एक साखळी बॉम्बस्फोट घडला होता. या बॉम्बस्फोटात सुमारे 350 नागरिकांचा बळी गेला होता. हा बॉम्बस्फोट 'आयसिस'ने घडवला होता. तसेच, हा स्फोट घडविण्यात मोहम्मद मिरसा या दहशतवाद्याची प्रमुख भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे.

Arabian Sea | (File Photo)

मोहम्मद मिरसा (mohammad mirza ) नावाचा दहशतवादी लपलेली एक संशयास्पद बोट अरबी समुद्रात (Arabian Sea) पालघर (Palghar) किनारपट्टीवर फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दल (Coast Guard) सतर्क झाले आहे. तटरक्षक दलानेच ही माहिती दिली असून, या माहितीनंतर पोलीस यंत्रणाही अलर्ट झाली आहे. या बोटीमध्ये इंधन आणि अन्नधान्याचा मोठा साठा असल्याचीह माहिती आहे. या बोटीत असलेला मोहम्मद मिरसा हा हा दहशतवादी 'आयसिस' या दहशतवादी संघटनेशी संबंधीत आहे. श्रीलंकेत नुकताच एक साखळी बॉम्बस्फोट घडला होता. या बॉम्बस्फोटात सुमारे 350 नागरिकांचा बळी गेला होता. हा बॉम्बस्फोट 'आयसिस'ने घडवला होता. तसेच, हा स्फोट घडविण्यात मोहम्मद मिरसा या दहशतवाद्याची प्रमुख भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी लक्षद्वीपमार्गे प्रवास करणारी एक संशयास्पद बोट गुप्तचर यंत्रणांनी केरळ किनारपट्टीवर पाहिली. या बोटीत एकूण 15 दहशतवादी असावेत असा संशय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. संशयास्पद बोटीच्या पार्श्वभूमिवर पालघर जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी अधीक्षक कार्यालयात एक संयुक्त बैठक घेतली. या बैठकीस इंटेलिजन्स ब्युरो, सीआयडी, गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवादी विरोधी पथक, कोस्टगार्ड, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभाग, सर्व सागरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, मच्छिमार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (हेही वाचा, पंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा)

संयुक्त बैठकीत अप्पर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी संबंधीतांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. तसेच, महाराष्ट्र पोलिसांना किनाऱ्यापासून 12 नॉटिकलपर्यंतच्या समुद्रातील भागात लक्ष ठेवण्याचे, कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे उपस्थितांनी दहशतवादी असलेल्या या बोटीवर बारीक लक्ष ठेवावे . सागरी पोलिसांनी स्वतः आपल्या जवळील चार स्पीडबोटींद्वारे पेट्रोलिंगला जावे. लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे स्पष्ट निर्देशही अप्पर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी संबंधितांना दिले.