Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपुत प्रकरणात मुंबई पोलिसांनी 'या' कारणाने तक्रार दाखल केली नाही, अनिल देशमुख यांंचा खुलासा
सुशांंतचा मृत्यु झाल्यावर सगळीकडुन विचारणा होत असुनही मुंंबई पोलिसांंनी एकही तक्रार दाखल का केली नाही, याच प्रश्नावर आज गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांंनी एका मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर उत्तर दिले आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) याच्या मृत्युला तीन महिने पुर्ण झाले आहेत. हा प्रश्न सुशांंतच्या जगविदेशातील चाहत्यांंकडुन इतका जास्त मोठा बनवला गेलाय की सध्या देशातील एक ज्वलंत प्रश्न म्हणुन याकडे पाहिले जातेय. सुशांंतच्या मृत्युने बॉलिवूड मधील नेपोटिझम ते मुंंबई पोलिसांंच्या (Mumbai Police) कारवाया या सगळ्याच मुद्द्यांंवर सवाल उभे केले आहेत. यातील एक मुख्य मुद्दा म्हणजे सुशांंतचा मृत्यु झाल्यावर सगळीकडुन विचारणा होत असुनही मुंंबई पोलिसांंनी एकही तक्रार दाखल का केली नाही, याच प्रश्नावर आज गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांंनी एका मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर उत्तर दिले आहे.
अनिल देशमुख यांंच्या माहितीनुसार, जेव्हा सुशांत च्या वडिलांसह सर्व कुटुंबीय मुंबईला आलं तेव्हा त्यांंनी स्वतः ही आत्महत्या असल्याचे तसेच आमचा कोणावरही संशय नाही, असं लिहुन दिलं होतं. त्यांनी आम्हाला अमूक एका व्यक्तीवर संशय आहे, असं काही म्हंंटलं असतं तर पुढे FIR दाखल करण्याची मुद्दा येतो. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांच्या निरीक्षणात मुंबई पोलिसांबद्दल अतिशय चांगला तपास केला, असा शेरा दिला आहे त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन करण्यासाठी अशा खेळी खेळणे आणि चुकीचे आरोप लगावणे गैर आहे असे सुद्धा देशमुख यांंनी म्हंंटले आहे.
दरम्यान, सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आहे आता त्यात ड्रग्ज कारवाई करण्यात आली. पण सुशांत सिंहचा मृत्यू आत्महत्या की हत्या हा मुद्दा कुठेतरी मागे राहतोय आणि त्याचा सीबीआयनं मुख्यत्वे आणि तातडीनं तपास करायला हवा असेही अनिल देशमुख यांंनी मुलाखतीत उत्तर देताना म्हंंटले आहे.
दुसरीकडे, कंंगनाच्या मुद्द्याला फार महत्व देणंं गरजेचं नाही असेही देशमुख यांंनी म्हंंटलंं आहे. कंगनाच्या मुद्द्यावरुन अलिकडे देशमुख यांंच्या नागपुर कार्यालयात धमकीचे कॉल आले होते मात्र अशा गोष्टींंना घाबरण्याची गरज नाही, पंंतप्रधानांंना सुद्धा असे कॉल येत असतात अशी प्रतिक्रिया देशमुख यांंनी दिली आहे.