Sushant Singh Rajput Death Case: आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांची क्वारंटाइनमधून सुटका; बिहारला परतण्यास मुंबई महानगरपालिकेची परवानगी

सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाची (Sushant Singh Rajput Death Case) तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी (Vinay Tiwari) यांना पाटणाला परतण्यास मुंबईमहानगर पालिकेकडून (BMC) परवानगी देण्यात आली आहे.

Vinay Tiwari (Photo Credit: ANI)

सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाची (Sushant Singh Rajput Death Case) तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी (Vinay Tiwari) यांना बिहारला परतण्यास मुंबईमहानगर पालिकेकडून (BMC) परवानगी देण्यात आली आहे. यामुळे विनय तिवारी यांची क्वारंटाईनमधून सुटका करण्यात आली होती. आज संध्याकाळी विनय तिवारी पाटणाला परतणार असल्याची माहिती त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले इतर चार अधिकारी गुरुवारी पाटण्याला परतले आहेत. मुंबई पोलिसांना सूचना दिल्यानंतर विनय तिवारी मुंबईत दाखल झाले होते. मात्र, तरीदेखील त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते, असा आरोप डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केला होता.

सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई दाखल झालेल्या विनय तिवारी यांना 2 ऑगस्ट रोजी होम क्वारंटाईन करण्यात आले होते. विनय तिवारी यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारत त्यांना बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, मुबई महानगरपालिकेवर निर्णयावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी नाराजी दर्शवली होती. मात्र, विनय तिवारी यांची क्वारंटाइनमधून सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने टेक्स्ट मॅसेजच्या माध्यमातून मला क्वारंटाइनमधून मुक्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच मला बिहारला परतण्यास परवानगीदेखील दिली आहे. मी आता पाटण्याला जाणार, अशी माहिती विनय तिवारी यांनी एएनआयला दिली आहे. हे दे देखील वाचा- Sushant Singh Rajput Death Case: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात CBI ने रिया चक्रवर्ती, तिचे वडील, आई, भाऊ, मॅनेजरसह इतरांविरुद्ध FIR दाखल केला

एएनआयचे ट्वीट-

 

सुशांत सिंह राजपूत यांनी 14 जून रोजी मुंबई येथील आपल्या राहत्या गळफास लावून आत्महत्या केली होती. ज्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती. परंतु, सुशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? अद्यापही हे स्पष्ट झाले नाही. हे प्रकरण सीबीआयकडे सोपण्यात आले असून याप्रकरणी आतापर्यंत सात जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.