Rahul Shewale on Aaditya Thackeray: 'एयू' म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे, या नावाने रिया चक्रवर्ती हिच्या फोनवर 44 कॉल, सुशांत सिंह प्रकरणात राहुल शेवाळे यांचा आरोप

खरे तर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना सीबीआयने क्लिन चिट दिली आहे.

Rahul Shewale, Aaditya Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी लोकसभेमध्ये पुन्हा एका आदित्य उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खरे तर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना सीबीआयने क्लिन चिट दिली आहे. तरीदेखील एका खासदारनेच पुन्हा एकदा संसदेच्या सभागृहात हा मुद्दा काढल्याने प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. रिया चक्रवर्ती हिच्या फोनवर 'एयू 'नावाने सेव असलेला फोन क्रमांक हा आदित्य उद्धव ठाकरे यांचा होता. याच फोन क्रमांकावरुन रियाच्या फोनवर 44 फोन कॉल आले होते, असा दावा बिहार पोलिसांच्या हवाल्याने राहुल शेवाळे यांनी केला आहे.

राहुल शेवाळे यांनी संसदेत आरोप करताच उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना नेत्या मनिशा कायंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल शेवाळे यांच्याकडे असतील तर त्यांनी ते सर्व पुरावे द्यावेत. मगच आरोप करावेत असे मनिशा कायंदे यांनी म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकणात सुरुवातीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यातही केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी सुशात सिंह प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पण पुढे या प्रकरणाचा तपास करणारी केंद्रीय संस्था सीबीआयनेच सांगितले की, आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही. राजकीय हेतुने प्रेरीत होऊन त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. (हेही वाचा, Mumbai Weather Report: मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, आदित्य ठाकरे यांच्याकडून राज्य सरकारवर टीकास्त्र; प्रदूषणाचे स्रोत शोधून कारवाईची मागणी)

सीबीआयच्या अहवालानंतर सुशांत सिंह राजपूत प्रकरण थंडावले असले तरी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या आरोपांमुळे प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळे यांनी संसदेत बोलताना म्हटले की, हे प्रकरण (सुशांत राजपूत) गंभीर आहे. त्यात एयूचा उल्लेख म्हणजेच तो आदित्य उद्धव ठाकरे असा आहे. या प्रकरणात बिहार पोलिसांचा आणि महाराष्ट्र पोलिसांचा तपास वेगवेगळा आहे. त्यामुळे या सर्व प्रकरमाची माहिती जनतेला मिळायला हवी, असेही राहुल शेवाळे यांनी म्हटले.