Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत ची हत्या की आत्महत्या; CBI ने लवकरात लवकर खुलासा करावा- गृहमंत्री अनिल देशमुख

मात्र तपासाला 5 महिने होऊनही अद्याप सीबीआयने सुशांतच्या मृत्यूबाबत कोणताही खुलासा न केलेला नाही.

Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करत आहे. मात्र तपासाला 5 महिने होऊनही अद्याप सीबीआयने सुशांतच्या मृत्यूबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी चौकशीचे निष्कर्ष लवकरात लवकर जाहीर करावे अशी विनंती सीबीआयाला केली आहे. (सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल सीबीआयने सार्वजनिक करावा; महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी)

या प्रकरणी अनिल देशमुख म्हणाले की, "तपास सुरू होऊन 5 महिन्यांहून अधिक काळ झाला आहे पण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा खून झाला की आत्महत्या याचा खुलासा सीबीआयने केलेला नाही. चौकशीचे निष्कर्ष लवकरात लवकर जाहीर करावे अशी मी सीबीआयला विनंती करतो." दरम्यान, मध्यंतरी सीबीआयचा सुशांत प्रकरणचा तपास पूर्ण झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत रंगत होत्या. मात्र माध्यमात फिरणाऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्टीकरण सीबीआयकडून देण्यात आले होते. (Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत याची हत्या नसून आत्महत्याच; AIIMS चा अंतिम अहवाल CBI कडे सुपूर्त)

ANI Tweet:

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुंबईतील आपल्या राहत्या घरी 14 जून रोजी मृत अवस्थेत आढळला. प्रथमदर्शनी ती आत्महत्या असावी असे निर्दशनास आले. मात्र त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले आणि सुशांतची हत्या असल्याचा दावा पटना पोलिसांकडून होऊ लागला. त्यानंतर मुंबई आणि पटना पोलिस यांच्यात एकच वाद रंगला. मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार यांच्यावर जोरदार टीकाही झाली. हा वाद न्यायालयात गेल्यानंतर मुंबई पोलिसांच्या हाती असलेले सुशांत प्रकरणाचा तपास न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला. परंतु, अद्याप हे प्रकरण निष्कर्षापर्यंत पोहचले नसल्याने सीबीआयने याबाबतचा निकाल लवकारत लवकर जाहीर करावा, अशी विनंती गृहमंत्र्यांनी केली आहे.