Supriya Sule Banner: महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री बॅनरवरुन सुप्रिया सुळे भडकल्या; म्हणाल्या, मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा

सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असा मजकूर लिहण्यात आला आहे. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्याचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुखे शरद पवार यांचाही फोटो आहे.

Supriya Sule (PC- PTI)

Supriya Sule Banner: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या बॅनर (Banner) वरून राज्यात पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. सुप्रिया सुळे यांचा फोटो महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री म्हणून लावण्यात आला आहे. या बॅनरवरून आता सुप्रिया सुळे फडकल्या असून त्यांनी थेट मुंबई पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार करत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिलेचा फोटो कुठेही वापरता येत नाही आणि फोटो लावण्याचा कोणालाही अधिकार नाही. एकतर पोस्टर कोणी लावला? हा पुरावा असला पाहिजे. कोणी कोणाचे पोस्टवर फोटो लावले पाहिजेत, याचा कोणाला अधिकार नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचा कुणालाही अधिकार नाही. माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे. माझा फोटो किंवा पोस्टर मला न सांगता कुठल्या पुरुषाने किंवा महिलेने लावला असेल तर मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा. (हेही वाचा - Sanjay Raut on Devendra Fadnavis: चाळीस खोके अंगावर पडल्याने देवेंद्र फडणवीस दबावात- संजय राऊत)

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, हा फोटो कुठल्या पक्षाने लावलाय का? कोणत्या व्यक्तीने लावलाय का? असा फोटो कोणी लावू शकतो का? जर हा फोटो असा लावला असेल तर हा देश कायदे नियमाने चालतो का? हा फोटो कोणी लावला याचा शोध घेऊन मला मुंबई पोलिसांनी न्याय द्यावा, अशी मागणी देखील सुप्रिया सुळेंनी केली आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांचा फोटो असलेल्या बॅनरवर महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असा मजकूर लिहण्यात आला आहे. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्याचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुखे शरद पवार यांचाही फोटो आहे.

तथापी, यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचा फोटोही भावी मुख्यमंत्री म्हणून लावण्यात आला होता. अजित पवार यांच्या बॅनरवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच दादा, एकच वादा, अजित दादा...असा मजकूर लिहिण्यात आला होता. या बॅनवर कोणाचंही नाव नाही. त्यामुळे हे बॅनर नेमकी कोणी लावले, याचा शोध मुंबई पोलिसांनी लावावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.