Lok Sabha Election 2019: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर; सुप्रिया सुळे, उदयन राजे भोसले, आनंद परांजपे यांच्या सह 11 उमेदवार जाहीर
तर देशभरातील निवडणुकीचा निकाल 23 मे 2019 दिवशी लागणार आहे.
List of NCP Candidates For Loksabha polls 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) च्या तारखांची घोषणा झाल्यानंतर देशभरात राजकीय पक्ष कामाला लागले आहे. आज कॉंग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी पक्षाने (NCP) आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पवार कुटुंबातून केवळ सुप्रिया सुळेच्या (Supriya Sule) नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या आणि अपेक्षित नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षाने बारावा उमेदवार म्हणून राजू शेट्टी यांचा नावाचा समावेश केला आहे. हातकंणगले मधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेट्टींना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. पार्थ पवार यांच्या नावाची सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. पण खुद्द शरद पवार आणि पार्थ पवार ही दोन्ही नावं अजूनही गुलदस्त्यामध्ये ठेवली आहेत.Lok Sabha Election 2019: मावळ मधील उमेदवार अद्याप जाहीर नाही: शरद पवार; पार्थ पवार यांच्या उमेदवारी बद्दल 'सस्पेंस' कायम
राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर
१) सुप्रिया सुळे-बारामती
२) सुनील तटकरे-रायगड
३) उदयनराजे भोसले-सातारा
४) आनंद परांजपे- ठाणे
५) बाबाजी पाटील-कल्याण
६) धनंजय महाडीक-कोल्हापूर
७) मोहम्मद फैजल-लक्षद्विप
८) संजय दीना पाटील-ईशान्य मुंबई
९) राजेंद्र शिंगणे-बुलडाणा
१०) गुलाबराव देवकर-जळगाव
११) राजेश विटेकर-परभणी
11,18,23 आणि 29 एप्रिल यादिवशी महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे. तर देशभरातील निवडणुकीचा निकाल 23 मे 2019 दिवशी लागणार आहे.