देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खोट्या Affidavit प्रकरणी सुनावणी पूर्ण; निकाल ठेवला राखून
निवडणूक प्रतिज्ञापत्रकात महिती लपविल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात सुप्रिम कोर्टात (Supreme Court) सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे मात्र त्याचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे
निवडणूक प्रतिज्ञापत्रकात महिती लपविल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात सुप्रिम कोर्टात (Supreme Court) सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे मात्र त्याचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. सर न्यायाधीश रंजन गोगाई, दीपल गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांनी हा निकाल राखून ठेवला आहे.न्यायालयात देवेंद्र फडणवीस यांची बाजू मुकूल रोहतगी यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खोट्या Affidavit प्रकरणी 23 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मधील विधानसभेच्या निवडणूकीसाठी दिलेला अर्ज खोटा असून त्यांच्यावरील दोन फौजदारी प्रकरणांची महिती लपविली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी ही माहिती हेतूपूर्वक लपवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीस यांची निवड रद्द करावी अशी याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आहे. सतिश उके यांनी ही याचिका दाखल केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी सतिश उके यांची याचिका रद्द केली होती. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतील निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. 2009 आणि 2014 च्या नागपूर दक्षिण पश्चिम येथून उमेदवारीचा अर्ज भरताना फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे.असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने सादर अहवालानुसार देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री आहेत. फडणवीस यांच्यावर सर्वाधिक २२ गुन्हे आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)