Sunil Kedar Hospitalised: सुनील केदार हॉस्पिटल मध्ये दाखल; डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याच्या समस्या

लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमीत कमी शिक्षा व्हावी असा युक्तिवाद वकिलांमार्फत केला होता मात्र कोर्टाने त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

सुनील केदार बँक घोटाळा प्रकरणात दोषी | (Photo credit: archived, edited, representative image)

नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा प्रकरणामध्ये कॉंग्रेस नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर रात्री उशिरा त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याच्या समस्या जाणवत असल्याने त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. केदार यांना सेंट्रल जेलला (Central Jail) नेण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यावेळी डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याने अस्वस्थ वाटत होते त्यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले.

सुनिल केदार यांच्यावर आयसीयू मध्ये डॉक्टरांच्या निगराणी खाली उपचार सुरू आहेत. रुग्णालयात गेल्यानंतर केदार यांनी मायग्रेनचा त्रास असल्याने तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर डॉक्टरांनी ECG काढला आहे. त्यामध्ये काही बदल आहेत. त्यामुळे डॉक्टर सध्या सुनील केदार यांची अतिदक्षता विभागामध्ये चाचणी करत आहेत. नक्की वाचा: Sunil Kedar Found Guilty In NDCCB Scam: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेस आमदार सुनील केदार दोषी .

सुनील केदार यांच्यावर दोष आरोप सिद्ध झाल्यनंतर सौम्य शिक्षेची मागणी त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. ते लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमीत कमी शिक्षा व्हावी असा युक्तिवाद वकिलांमार्फत केला होता मात्र कोर्टाने त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

2002 मध्ये 105 कोटी पेक्षा अधिक रूपयांचा घोटाळा नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात समोर आलं आहे. यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. सुनील केदार त्यावेळेस बँकेचे अध्यक्ष होते आणि आता ते या खटल्यातील मुख्य आरोपी आहेत. खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. त्यामुळे केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.