Summer Vacation Activities for Kids: उन्हाळी सुट्टीतील उपक्रम, मुलांचे मनोरंजन होईल; वाढत्या तापमानापासून बच्चे कंपनी सुरक्षीतही राहील

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी हा महत्त्वाचा घटक असला तरी दुसऱ्या बाजूला घरातील मुलांना उन्हाळी सुट्टी (Summer Holiday) आनंदाने साजरी करण्याचे वेध लागले आहेत. तुमची मुले लाहान असतील आणि त्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या असतील तर तुम्ही फारसे उन्हात न जाता घरी राहून देखील उन्हाळी सुट्टीचा आनंद घेऊ शकता. म्हणूनच लहान मुलांना घरी राबवता येतील असे खास उपक्रम आम्ही येथे देत आहोत.

Summer Vacation Activities | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Summer Vacation Activities: राज्यासह देशभरातील तापमान वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा उष्णतेची लाट (Heat Wave) निर्माण होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने आगोदरच दिला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची काळजी हा महत्त्वाचा घटक असला तरी दुसऱ्या बाजूला घरातील मुलांना उन्हाळी सुट्टी (Summer Holiday) आनंदाने साजरी करण्याचे वेध लागले आहेत. तुमची मुले लाहान असतील आणि त्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या असतील तर तुम्ही फारसे उन्हात न जाता घरी राहून देखील उन्हाळी सुट्टीचा आनंद घेऊ शकता. म्हणूनच लहान मुलांना घरी राबवता येतील असे खास उपक्रम आम्ही येथे देत आहोत.

अंगणातील खेळ: हुला हूप्स, जंप रोप्स आणि ब्लँकेट्स यांसारख्या घरगुती वस्तू वापरून तुम्ही तुमच्या घरामागील अंगण एका मजेशीर मैदान बनवू शकता. जेथे तुमची मुले उन्हापासून सुरक्षीतही राहतील आणि दुपारच्या किंवा सुट्टीतील फावल्या वेळात काय करावे याची फारशी चिंता न करता आनंदही घेतील. (हेही वाचा, उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी ही आहेत भारतातील काही हटके आणि स्वस्त ठिकाणे)

ताऱ्यांचे बेट: घराच्या अंगणात किंवा घराच्या गच्चीवर छानसा एक तंबू ठोका. जेथे तुम्हाला कॅम्पिंगचा आनंद अनुभवता येईल आणि रात्रीच्या वेळी तंबुच छत बाजूला केले की आकाशातील चांदण्यांचा मुलांना आनंद देता येईल. अलिकडील काळात शहरात राहणाऱ्या मुलांना चांदण्या, चंद्र पाहायला मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक मजेशीर आनंद असू शकतो.

सायकल चालवणे: मुलांना छान सायकल आणा. त्यांना सायकलींग करण्याचा छान आनंद घ्यायला शिकू द्या. त्यांना आपली सायकल, बाईक हवी तशी सजवू द्या. त्यांना सर्जनशिल व्हायला मदत करा. सायकल चालविल्याने ते तंदुरुस्तही राहतील आणि त्यांना अधिक आहाराची आवश्यकताही भासेल.

मातिकाम: शेतातून किंवा दुकानातून माती आणा. त्या मातीच्या माध्यमातून त्यांना विविध आकार, प्राणी, वस्तू बनविण्यास सांगा. ज्यातून त्यांच्या कल्पकतेला बहर येईल.

स्वयंपाकाची कौशल्ये शिका: मुलांना छोट्या छोट्या पाककृतींमध्ये सहभागी करुन घ्या. ज्यामुळे त्यांना विविध पदार्थ, घरगुती वस्तू, मसाले आणि भाज्यांची माहिती मिळेलच. परंतू, त्यांना स्वयंपाकाजी गोडीही लागेल. ज्यातून भविष्यात वेळ पडली तर ते स्वत: छोट्या रेसीपी बनवू शकतात.

पिकनिक आयोजित करा: घराच्या अंगणा, शेतात एक छोटी पिकनीक आयोजित करा. जेथे मुलांना मैदानी खेळ खेळता येतील. इतकेच नव्हे तर तिथे सँडवीच, धपाटी भाकरी असा छानसा बेतही आखा.

उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये उन्हाच्या कडाक्यापासून बचाव करत मुलांना देता येतील अशा अनेक गोष्टी आपणास करता येऊ शकतात. जेणेकरुन आपणास सुट्टीचा आनंदही घेता येईल आणि मुलांनाही कामात व्यग्र ठेवता येईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement