Jalgaon News: उन्हाचा कहर! जळगावमध्ये उष्माघाताने 100 मेंढ्या दगावल्या, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात उष्माघाताने 100 मेंढ्या दगावल्या आहेत. तिथे तापमानाचा पारा 47 अंशांवर जाऊन पोहोचला आहे.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

 Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट(Heatwave) प्रचंड प्रमाणावर आहे. तिथे तापमानाचा पारा 47 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचला आहे. कडक उन्हाचा फटका माणसांसह प्राण्यांनाही बसत आहे. मुक्ताईनगर तालुक्यात उष्माघाताने 100 मेंढ्या दगावल्या आहेत. काही दिवसांपूर्वी उन्हाच्या तडाख्यात वाहतूक करणाऱ्या ट्रकलाच भीषण आग लागल्याची घटना घडली होती. (हेही वाचा: Nagpur Car Accident: कारच्या धडकेत तीन वर्षाच्या मुलासह दोन जखमी, तिघांना अटक, संतप्त जमावाने फोडल्या काचा (Watch Video))

चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट

जळगावीमधील मेंढ्या दगावल्याच्या घटनेनंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, नुकसानग्रस्त मेंढपाळ कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे. तसेच, स्थानिक पशू चिकित्सक यांनी या मेंढ्यांचे शवविच्छेदन केले असून उष्मा घातामुळेच मेंढ्या मरण पावल्याचे निदान त्यांच्या अहवालातून समोर आले आहे.

जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा गावात मेंढपाळ कुटुंबीयांच्या 100 हून अधिक मेंढ्यांचा उष्माघातामुळे दगावल्या. या घटनेने ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.