Suicide In ST Bus at Palghar: एसटी बस चालकाचा सहकर्मचार्‍यांचा त्रासाला कंटाळून बस मध्येच आत्महत्येचा प्रयत्न

तक्रार करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नव्हती. म्हणून त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते.

Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

एमएसआरटीसी (MSRTC) च्या 36 वर्षीय बस ड्रायव्हरने (Bus Driver) पालघर (Palghar) मधील जव्हार (Jawar) येथे एसटी मध्येच गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना जव्हार बस डेपोमधील आहे. गुरूवार 22 जूनच्या सकाळी या प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे.

एका रोपच्या मदतीने चालकाने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. अशातच सुरक्षा रक्षकाने हा प्रकार पाहिला आणि त्याच्या साथीदाराला घेऊन तो बसच्या दिशेने धावला. दोघांच्या प्रसंगावधानतेमुळे बस चालकाचा जीव वाचला. त्याला आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यात त्यांना यश आल्याची माहिती बस डेपो च्या अधिकार्‍यांनी PTI शी बोलताना दिली आहे. सध्या चालक उपचारांसाठी स्थानिक रूग्णालयामध्ये आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चालक हा एमएसआरडीसीच्या कर्मचार्‍यांच्या छळाला वैतागला होता. तक्रार करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नव्हती.

एसटी ही गावागावात पोहचणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. परंतू मागील काही वर्षांपासून एसटी ची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. यामधून अनेकांना घराचं आर्थिक गणित मांडणं देखील कठीण झालं आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून देखील यापूर्वी अशा प्रकारे अनेकांनी एसटी बस मध्येच गळफास घेत, विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.